अखिल भारतीय मानांकन टेनिस : अविष्काकडून यूब्रार्नीचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 03:55 AM2018-04-05T03:55:05+5:302018-04-05T03:55:05+5:30
जयेश पुंगलिया, फैजल कुमार, इशाक इकबाल, कुणाल वझिरानी, नताशा पल्हा, नित्याराज बाबूराज, अविष्का गुप्ता, हुमेरा शेख यांनी आपापल्या गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अखिल भारतीय मानांकन पुरुष व महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पुणे - जयेश पुंगलिया, फैजल कुमार, इशाक इकबाल, कुणाल वझिरानी, नताशा पल्हा, नित्याराज बाबूराज, अविष्का गुप्ता, हुमेरा शेख यांनी आपापल्या गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अखिल भारतीय मानांकन पुरुष व महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
अखिल भारतीय टेनिस महासंघ आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेने पाचगणी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महिला गटात सहाव्या मानांकित झारखंडच्या अविष्का गुप्ताने चौथ्या मानांकित पश्चिम बंगालच्या यूब्रानी बॅनर्जीचा टायब्रेकमध्ये ४-६, ७-६ (७), ६-४ गुणांनी पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित नताशा पल्हाने अनुशा कोंडावेत्तीचा ६-१, ७-५ गुणांनी पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित तेलंगणाच्या हुमेरा शेखने मंगळवारी मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळविणाºया महाराष्ट्राच्या सालसा आहेरला ६-४, ६-३ गुणांनी नमवित उपांत्य फेरी गाठली.
पुरुष गटातील उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित जयेश पुंगलियाने आठव्या मानांकित दिल्लीच्या अनुराग नेनवानीचा ६-३, ७-५ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. राजस्थानच्या अव्वल मानांकित फैजल कुमारने फरदीन कुमारचा ६-३, ६-३ असा पराभव केला. तिसºया मानांकित पश्चिम बंगालच्या इशाक इकबालने तेलंगणाच्या सिवादीप कोसाराजूचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
सविस्तर निकाल :
एकेरी : पुरुष गट : उपांत्यपूर्व फेरी : फैजल कुमार (१) वि. वि. फरदीन कुमार ६-३, ६-३; जयेश पुंगलिया (४) वि. वि. अनुराग नेनवानी (८) ६-३, ७-५; इशाक इकबाल (३) वि. वि. सिवादीप कोसाराजू ६-२, ६-३; कुणाल वझिरानी वि. वि. परमवीर बाजवा (२) ६-३, ३-० सामना सोडून दिला; महिला गट : नताशा पल्हा (१) वि. वि. अनुशा कोंडावेत्ती ६-१, ७-५; नित्याराज बाबूराज (३) वि. वि. सौम्या विज (७) ६-४, ६-१; अविष्का गुप्ता (६) वि. वि. यूब्रानी बॅनर्जी (४) ४-६, ७-६ (७), ६-४; हुमेरा शेख (२) वि. वि. सालसा आहेर ६-४, ६-३; दुहेरी : पुरुष गट : रोहन भाटिया/अरमान भाटिया वि. वि. एस. रवी शंकर/रित्विक आनंद ६-२, ६-३; निकित रेड्डी/ऋषी रेड्डी वि. वि. नितीन गुंडूबोईना/सिवादीप कोसाराजू ६-४, ६-२; जयेश पुंगलिया/कुणाल वझिरानी वि. वि. अंशु कुमार भुयान/चिन्मय प्रधान ६-४, ६-३; फैजल कुमार/फरदीन कुमार पुढे चाल वि. अनुराग नेनवानी/परमवीर बाजवा.
महिला गट : हुमेरा शेख/सालसा आहेर वि. वि. यूब्रानी बॅनर्जी/नताशा पल्हा ७-६ (५), ६-३; अपूर्वा एसबी/ अविष्का गुप्ता वि. वि. वैशाली ठाकूर/अमिशा पटेल ६-३, ६-१; आकांक्षा नित्तूरे/कोसामी सिन्हा वि. वि. माहरुख कोकणी/शर्मीन रिझवी ६-०, ६-२़