शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला. खेड चे आमदार दिलीप मोहिते हुकूमशहा असल्याचा शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आरोप.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 08:48 PM2021-03-13T20:48:45+5:302021-03-13T20:51:18+5:30

पंचायत समिती इमारतीवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टिका

All is not well between Mahavikas aghadi. Sena leader criticises NCP MLA. Calls him a dictator | शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला. खेड चे आमदार दिलीप मोहिते हुकूमशहा असल्याचा शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आरोप.

शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला. खेड चे आमदार दिलीप मोहिते हुकूमशहा असल्याचा शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आरोप.

Next

महाविकास आघाडी मध्ये सगळं आलबेल असल्याचा दावा नेते करत असतानाच स्थानिक पातळीवर मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये थेट संघर्ष पेटलेला पाहायला मिळतो आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांचावर तोफ डागत त्यांच्यावर थेट हुकूमशाह असल्याचा आरोप केला आहे. या वादाला कारणीभूत ठरले आहे ते पंचायत समितीचा इमारतीचे बांधकाम. 

खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते तालुक्याचे हुकूमशहा आहेत तर जिल्हा परिषदेच्या अशी टीका केली . त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेत त्यांचा मनमानी कारभार सुरु आहे अश टिका शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. 

खेड तालुक्यातील पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम व जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या जागेचा पूर्वीचा ठराव बहुमताने रद्द करण्यात आला. ही माहिती मिळाल्यानंतर, या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेड पंचायत समिती सभागृहात शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही इमारतीची जागा बदलल्यास येत्या २६ मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रवादी नेत्यांवर टीका करताना ते म्हणाले की, माजी आमदार स्व. गोरे यांनी इमारतीसाठी ५ कोटी रुपयांचा निधी आणून इमारत होण्यासाठी मंत्रालय पातळीपर्यंत कोरोना काळात प्रयत्न केले. त्यातच संसर्ग होऊन त्यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर स्थानिक शिवसेनेकडून या जागेत इमारत होण्यासाठी अस्मितेचा प्रश्न निर्माण केला गेला. गेल्या आठ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत बहुमताच्या जोरावर या जागेचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. पंचायत समितीची पाच कोटी रुपयांची नवीन इमारत, सध्याच्या पंचायत समितीसमोर मंजूर आहे. माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांनी इमारत मंजूर करून घेऊन, ठेकेदार नेमत भूमिपूजनही केले होते. मात्र, आमदार मोहिते हे या कामाला खोडा घालतात असल्याचेही त्यांनी सांगितले

Web Title: All is not well between Mahavikas aghadi. Sena leader criticises NCP MLA. Calls him a dictator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.