सणसरला सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:10 AM2021-05-22T04:10:35+5:302021-05-22T04:10:35+5:30

राज्य शासनाने उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना मिळावे असा आदेश मंजूर केला आणि परत तो रद्दही ...

All-Party 'Stop the Road' to Sansar | सणसरला सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’

सणसरला सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’

Next

राज्य शासनाने उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना मिळावे असा आदेश मंजूर केला आणि परत तो रद्दही केला. त्यावरून दोन्ही जिल्ह्यांमध्ये वातावरण तापले आहे. शुक्रवारी आंदोलकांनी अतिशय तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. हक्काचे पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. या वेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकाळ, रणजित निंबाळकर, विक्रमसिंह निंबाळकर, पिंटू गुप्ते, विजय शिरसाठ, अभयसिंह निंबाळकर, पार्थ निंबाळकर, प्रशांत पवार, शेतकरी कृती समितीचे प्रकाश ढोले, सागर भोईटे, शुभम निंबाळकर उपस्थित होते.

कोट

सोलापूरच्या कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय करायची नाही. मात्र, पुण्यामध्ये वापरलेल्या सांडपाण्यापैकी पाच टीएमसी पाणी हे येथील शेतकऱ्यांना मिळावे. सोलापूरचे वाटून दिलेले पाणी ते त्यांना तसेच राहणार आहे. हा प्रश्न फक्त वापरलेल्या सांडपाण्याचा आहे. सोलापूरच्या शेतकऱ्यांनीही येथील शेतकऱ्यांचा विचार करावा.

- ॲड. रणजित निंबाळकर, सरपंच, ग्रामपंचायत सणसर

Web Title: All-Party 'Stop the Road' to Sansar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.