शनिवारवाडा सभाबंदीवरून पुणे महापालिकेत सर्वपक्षीय गदारोळ; आयुक्तांकडून खुलाशाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 04:22 PM2018-01-30T16:22:19+5:302018-01-30T16:26:13+5:30

आयुक्तांनी शनिवारवाडा येथे सभाबंदी करण्यासंदर्भात काढलेल्या आदेशावरून महापालिका सर्वसाधारण सभेत मंगळवारी सर्वपक्षीय गोंधळ झाला आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

All political parties commotion in Pune Municipal Corporation on Shanivarwada issue; Demand for disclosure by Commissioner | शनिवारवाडा सभाबंदीवरून पुणे महापालिकेत सर्वपक्षीय गदारोळ; आयुक्तांकडून खुलाशाची मागणी

शनिवारवाडा सभाबंदीवरून पुणे महापालिकेत सर्वपक्षीय गदारोळ; आयुक्तांकडून खुलाशाची मागणी

Next
ठळक मुद्देशनिवारवाडा येथे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने राजकीय सभा, कायदा-सुव्यवस्थेचा बोजवाराअरविंद शिंदे यांनी आयुक्तांनी खुलासा करावा अशी केली मागणी

पुणे : आयुक्तांनी शनिवारवाडा येथे सभाबंदी करण्यासंदर्भात काढलेल्या आदेशावरून महापालिका सर्वसाधारण सभेत मंगळवारी सर्वपक्षीय गोंधळ झाला आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शनिवारवाडा येथे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने राजकीय सभा होत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडत असल्याने महापालिका आयुक्तांधी पोलिसांच्या गुप्त वार्ता शाखेचा आधार घेत तिथे सभाबंदी केली असल्याचे जाहीर केले. त्याविरोधात पहिले बिगुल खुद्द महापौर मुक्ता टिळक यांनीच फुंकले. 
नगरसेवक धीरज घाटे यांंनी हा विषय उपस्थित केला. अरविंद शिंदे यांनी आयुक्तांनी खुलासा करावा अशी मागणी केली. भाजपाच्या अने नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली. दिलीप बराटे व अन्य अनेक नगरसेवकांनीही अशी मागणी करीत आयुक्तांनी कोणाच्या आधारावर असा आदेश काढला ते स्पष्ट करावे अशी मागणी केली. अखेरीस महापौर मुक्ता टिळक यांनी शनिवारवाडा सुरूच राहणार सभाबंदी नाही असे सांगितले. मात्र सदस्यांनी ते अमान्य केले व खुलाशाची मागणी केली. आयुक्तानी हा विषय गटनेत्यांच्या सभेत मांडण्यात येइल व नंतर त्यावर सर्वसाधारण सभा निर्णय घेईल असे स्पष्ट केले. त्यानंतर गोंधळ शांत झाला.

Web Title: All political parties commotion in Pune Municipal Corporation on Shanivarwada issue; Demand for disclosure by Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.