जिल्ह्यातील सर्व शाळा ऑनलाइनच सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:26+5:302021-06-28T04:09:26+5:30

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे कोरोना मुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत ...

All schools in the district will continue online | जिल्ह्यातील सर्व शाळा ऑनलाइनच सुरू राहणार

जिल्ह्यातील सर्व शाळा ऑनलाइनच सुरू राहणार

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे कोरोना मुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागातर्फे आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले. शिक्षण विभागातर्फे यासंदर्भातील आवश्यक नियमावली तयार केले जाणार आहे. परंतु, शासनाकडून अद्याप शाळा सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. तसेच सद्य:स्थितीत जिल्ह्यातील एकही शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याची शिक्षण विभागाची व मुख्याध्यापकांची मानसिकता नाही.

---------------------

राज्य शासनाकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्यातरी केवळ ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे, शिक्षक कृती पत्रिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषय शिकवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या ऑफलाईन पद्धतीने एकही शाळा सुरू होणार नाही.

- स्मिता गौड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

-------------

कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेल्या भागात शाळा सुरू करता येऊ शकतात. मात्र, शासनाने या संदर्भात आवश्यक आदेश देणे गरजेचे आहे. मागील वर्षी शिक्षण विभागाने तयार केलेल्या नियमावलीनुसार शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु सद्य:स्थितीत शासनाकडून कुठल्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. -हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ, पुणे

--------------

जिल्हा परिषद शाळा -३,६३२

खासगी अनुदानित शाळा -१,३४६

खासगी विनाअनुदानित शाळा - १८५७

एकूण शाळा -७,४५५

कुठल्या वर्गात किती विद्यार्थी?

पाचवी -१,८६,९९६

सहावी -१,८३,२१४

सातवी -१,७७,८७३

आठवी -१,७०,८२२

नववी -१,६७,८६२

दहावी -१,४४,३८४

----

Web Title: All schools in the district will continue online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.