ऑल द बेस्ट; दहावीची परीक्षा आजपासून, एका तासापूर्वीच परिक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 06:31 AM2022-03-15T06:31:12+5:302022-03-15T06:31:18+5:30

राज्यातील १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

All the best; Instructions to be present at the examination center one hour before the 10th examination from today | ऑल द बेस्ट; दहावीची परीक्षा आजपासून, एका तासापूर्वीच परिक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना

ऑल द बेस्ट; दहावीची परीक्षा आजपासून, एका तासापूर्वीच परिक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेस मंगळवारपासून सुरुवात होत आहे. राज्यभरातील २१ हजार ३८४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत असून विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी एक तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहायचे आहे. राज्यातील १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यात ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर, ७ लाख ४९ हजार ४७८ विद्यार्थिनींचा समावेश आहे. 

Web Title: All the best; Instructions to be present at the examination center one hour before the 10th examination from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.