आटपाडीतील सर्व गावे टेंभू योजनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 11:35 PM2018-11-10T23:35:43+5:302018-11-10T23:35:55+5:30

भारत पाटणकर : बळीराजा स्मृती धरणाचा वर्धापनदिन

All the villages in Atpadi are in the Tembu scheme | आटपाडीतील सर्व गावे टेंभू योजनेत

आटपाडीतील सर्व गावे टेंभू योजनेत

Next

आळसंद : श्रमिक मुक्ती दलाने सातत्याने आंदोलन केल्यामुळे आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यात आला आहे. हे यश चळवळीच्या रेट्यामुळे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
बलवडी-तांदळगाव (ता. खानापूर) येथे बळीराजा जलसंवर्धन विकास संस्थेतर्फे बळीराजा धरणाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, यावेळी पाटणकर बोलत होते. यावेळी राज्य संघटक मोहनराव यादव, दिलीप पाटील, गेल आॅमवेट उपस्थित होते.

राज्य संघटक मोहनराव यादव म्हणाले, राज्यातील दुष्काळी भागाला आदर्शवत ठरावे असे बळीराजा धरण आहे. हे धरण म्हणजे परिवर्तनीय चळवळीचा पाया आहे. टेंभू व ताकारी योजनेचे पाणी समन्यायी पध्दतीने देण्याचे धोरण हाती घेणार आहे.
यावेळी दिलीप पाटील, अ‍ॅड. कृष्णा पाटील, आनंदराव पाटील, मारूती शिरतोडे, डॉ. संजय कांबळे, अजित खराडे यांचीही भाषणे
झाली. या कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे परशुराम माळी, देवकुमार दुपटे, विलास चव्हाण, सागर गोतपागर, विक्रम चव्हाण, सुरेश चव्हाण उपस्थित होते. डॉ. पाटणकर म्हणाले, आटपाडीला बंद पाईपलाईनद्वारे टेंभू योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. तो पॅटर्न राज्यभर स्वीकारावा, यासाठी डिसेंबरमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 

Web Title: All the villages in Atpadi are in the Tembu scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे