तेलगीची सर्व मिळकत जप्त करावी, ‘अल्ला माफ नही करेगा’ : शाहिदा तेलगीचा न्यायालयात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 02:39 PM2017-12-16T14:39:37+5:302017-12-16T14:50:53+5:30

मी ही बाब लपवून ठेवली तर ‘अल्ला मला माफ करणार नाही’ या मिळकतीची खातरजमा करुन त्या सीबीआयने जप्त करून देश हिता करीता वापर करावा, असे बनावट मुद्रांक गैरव्यवहार खटल्यातील आरोपी शाहीदा अब्दुल करीम तेलगी हिने म्हटले आहे़.

All will be seized, all will not be forgiven: application for Shahida Telgi court | तेलगीची सर्व मिळकत जप्त करावी, ‘अल्ला माफ नही करेगा’ : शाहिदा तेलगीचा न्यायालयात अर्ज

तेलगीची सर्व मिळकत जप्त करावी, ‘अल्ला माफ नही करेगा’ : शाहिदा तेलगीचा न्यायालयात अर्ज

Next
ठळक मुद्देतेलगीने जवळपास ६० हजार कोटींचा बनावट मुद्रांक गैरव्यवहार करून माजवून दिली होती खळबळमिळकतींची खातरजमा करुन त्या सीबीआयने जप्त करून देश हिता करीता वापराव्या : शाहिदा

पुणे : देशात खळबळ उडवून टाकणाऱ्या बनावट मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सुत्रधार व नुकतेच निधन पावलेला मुख्य आरोपी अब्दुल करीम लाडसाब तेलगीची पत्नी व बनावट मुद्रांक गैरव्यवहार खटल्यातील आरोपी शाहीदा अब्दुल करीम तेलगी  हिने पुणे येथील विशेष मोका न्यायालयात सीबीआय ने बनावट मुद्रांक गैरव्यवहाराचा फेर तपास करून तिच्या पतीने म्हणजेच अब्दुल करीम लाडसाब तेलगीने बनावट मुद्रांक गैरव्यवहारातून कमावलेल्या पैशातून मोठ्या प्रमाणातील स्थावर मिळकती सीबीआय कडून आजही जप्त करावयाच्या राहिल्या असून त्या स्थावर मिळकती सीबीआय ने फेर तपास व खातरजमा करून सरकार जमा कराव्यात असा अर्ज शाहीदा अब्दुल करीम तेलगी ने तिचे वकील अ‍ॅड मिलिंद पवार, अ‍ॅड प्रशांत जाधव यांच्यामार्फत पुण्यातील विशेष मोका न्यायालयात केला. हे जर मी केले नाही तर मला अल्ला माफ नही करेगा असे या अर्जात म्हटले आहे़  
अब्दुल करीम लाडसाब तेलगीने देशात जवळपास ६० हजार कोटींचा बनावट मुद्रांक गैरव्यवहार करून खळबळ माजवून दिली होती. तेलगीच्या घोटाळ्याने तपास यंत्रणा व तत्कालीन सरकार पुढे मोठे आव्हान उभे केले होते. तेलगीच्या घोटाळ्याच्या व्याप्ती जवळपास १३ राज्यात पसरली होती. बनावट मुद्रांक गैरव्यवहार गुन्ह्यात व खटल्यात अनेक बडे पोलीस अधिकारी, मोठे व्यावसायिक, मोठे राजकीय नेते यांना अटक होऊन जवळपास ६० हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याच्या अंदाज व्यक्त केला जात होता.
पोलिस खात्यातील अधिकारी, व्यावसायिक, राजकीय नेते यांना तेलगीला बनावट मुद्रांक गैरव्यवहार करण्यासाठी मदत केली या कारणास्तव अनेक उच्चपदस्थांना अटक करण्यात आली होती. शाहीदा तेलगी हीने देखील तिचा पती व बनावट मुद्रांक गैरव्यवहार मुख्य सूत्रधार अब्दुल करीम लाडसाब तेलगीला गुन्हा करणे कामी मदत केली असा तिच्यावर आरोप असून खटल्याची सुनावणी अद्यापही चालूच आहे.
अब्दुल करीम तेलगीने पत्नी शाहीदा व जवळच्या नातेवाईकांच्या नावावर काही स्थावर मिळकती बनावट मुद्रांक गैरव्यवहाराच्या पैशातून खरेदी केल्या व म्हणून शाहीदाने मुख्य आरोपी तेलगीला मदत केली असा आरोप ठेवून तिलाही सीबीआयने बनावट मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती.
बनावट मुद्रांक गैरव्यवहार खटल्यात अब्दुल करीम तेलगीसह काही जणांनी आपला गुन्हा कबुल केल्यावर न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली आहे़ ज्यांनी गुन्हा नाकबूल केला त्या आरोपींवर येथील विशेष मोका न्यायालयाचे न्यायाधीश एस़ एच़ ग्वालानी यांचे समोर खटला सुरू आहे़. सरकार पक्षाचे वतीने साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्याचे काम चालू आहे. खटल्यातील मुख्य आरोपी तेलगीचा न्यायालयीन कोठडीत बेंगलोर कारागृहात असताना निधन झाले. आरोपी शाहीदा तेलगी ही जामीनावर मुक्त असून सध्या खानापूर, बेळगाव येथे मूळ गावी वास्तव्यास असून ती देखील अनेक आजारांनी त्रस्त आहे.
शाहिदा तेलगी हिच्या वतीने अ‍ॅड़ मिलिंद पवार यांनी शनिवारी न्यायालयात एक अर्ज सादर केला़ या अर्जात तेलगीच्या मृत्युनंतर कर्नाटक राज्यातील बेळगाव, खानापूर व इतर काही स्थावर मिळकती आहेत़ ज्या तेलगीने खरेदी केलेल्या आहेत़ ज्याची आयकर विभागाकडे नोंदी आहेत़ त्यावर तेलगीने आयकर भरलेला आहे. त्या कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर खरेदी केल्या आहेत. अशा सर्व स्थावर मिळकती सीबीआयने फेर तपास व खातरजमा करून सरकारजमा करून जप्त करण्यात याव्यात. शाहीदा ही देखील नेहमी आजारी असते़. बनावट मुद्रांक गैरव्यवहाराशी तिचा काही एक संबंध नव्हता फक्त तिच्या पतीच्या दुष्कृत्यामुळे तिलाही या खटल्यात गोवले गेले. अजूनही काही स्थावर मिळकती आहेत, ज्या अद्यापही जप्त करण्यात आलेल्या नाहीत. मी ही बाब लपवून ठेवली तर ‘अल्ला मला माफ करणार नाही’ या मिळकतीची खातरजमा करुन त्या सीबीआयने जप्त करून देश हिता करीता वापर करावा, असे म्हटले आहे़     
विशेष मोका न्यायालयाने या अर्जावर सीबीआय व सरकार पक्षाचे म्हणणे मांडण्यास सांगुन पुढील सुनावणी ३ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे़ 

Web Title: All will be seized, all will not be forgiven: application for Shahida Telgi court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.