एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा, चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 06:39 AM2018-01-09T06:39:24+5:302018-01-09T06:39:46+5:30
शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेमध्ये चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपावरून परिषदेच्या ६ आयोजकांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : शनिवारवाड्यावर ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेमध्ये चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपावरून परिषदेच्या ६ आयोजकांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कबीर कला मंचचे सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार, रमेश गावचोर, दीपक डेंगळे, ज्योती जगताप, सागर गोरखे यांच्याविरुद्ध कलम १५३ अ, ५०५, ११७, ३४ अन्वये विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी तुषार दामगुडे (वय ३७, रा. संतोष नगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. एल्गार परिषदेमध्ये सुधीर ढवळे, रमेश गायचोर, ज्योती जगताप यांनी समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी चिथावणीखोर गाणी सादर केली. यापूर्वी यातील काही जणांनी नक्षली संबंध असल्यावरून चौकशी झाली असल्याची तक्रार
दामगुडे यांनी केली आहे.