अंदुरेवरुन जितेंद्र अाव्हाड अाणि धीरज घाटे यांच्यात अाराेप-प्रत्याराेप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 07:54 PM2018-08-20T19:54:33+5:302018-08-20T20:06:30+5:30

डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सचिन अंदुरे याच्यावरुन अामदार जितेंद्र अाव्हाड आणि नगरसेवक धीरज घाटे यांच्यात अाराेप-प्रत्याराेप हाेत अाहेत.

allegations between jitendra awhad and dhiraj ghate | अंदुरेवरुन जितेंद्र अाव्हाड अाणि धीरज घाटे यांच्यात अाराेप-प्रत्याराेप

अंदुरेवरुन जितेंद्र अाव्हाड अाणि धीरज घाटे यांच्यात अाराेप-प्रत्याराेप

googlenewsNext

पुणे : डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येप्रकरणी सी बी अायने अटक केलेला सचिन अंदुरे हा तीन वर्षापूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयात माझ्यावर हल्ला झाला तेव्हा पुण्यातील भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांच्या साेबत असल्याचा दावा अामदार जितेंद्र अाव्हाड यांनी केला अाहे. सचिन अंदुरेचा फाेटाे ट्विट करुन त्यांनी हा दावा केला अाहे. हा दावा घाटे यांनी खाेडून काढला असून जितेंद्र अाव्हाड यांच्याविराेधात सायबर क्राइमकडे घाटे यांनी तक्रार दाखल केली अाहे. 


    डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अंदुरेला न्यायालयाने 26 अाॅगस्ट पर्यंत पाेलिस काेठडी सुनावली अाहे. सचिन अंदुरेचे नाव समाेर येताच अाराेप प्रत्याराेपांना अाता सुरुवात झाली अाहे.  कन्हैय्याकुमार आणि उमर खलीदच्या मुद्यांवरून पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयांत आव्हाड यांनी मार्च 2015 मध्ये आंदोलन केले होते. त्यांच्या विराेधात त्यावेळी भाजप युवा माेर्चाचे कार्यकर्ते उतरले हाेते, त्यावेळी घाटे सुद्धा त्याठिकाणी उपस्थित हाेते. अंदुरेचे नाव दाभाेलकरांच्या प्रकरणात समाेर अाल्यानंतर अाव्हाड यांनी ट्विट करत 3 वर्षापूर्वी पुण्यातील फर्ग्युसन काॅलेजमध्ये जाे माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला तेव्हा हा इसम म्हणजे सचिन अंदुरे धीरज घाटे बराेबर तेथे उपस्थित हाेता असे म्हणत अंदुरेचे फाेटाे पाेस्ट केले अाहेत. त्यावर उत्तर देताना जाेक अाॅफ द मिलेनियम पाेलिस अाणि माध्यमांकडे तेव्हाचे फुटेज उपलब्ध अाहे. अंदुरे तेव्हा अाणि कधीही माझ्यासाेबत नव्हता हे तपासाअंती समाेर येईलच. हे त्रिवार सत्य अाहे. अाराेप बिनबुडाचा अाहे. खाेटे अाराेप केल्याप्रकरणी मी लवकरच अब्रुनुकसानीचा दावा दाखल करीत अाहे. असे ट्विट घाटे यांनी केले अाहे.  


     घाटे म्हणाले, सचिन अंदुरेला मी अाेळखत नाही. तीन वर्षांपूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयात जे अांदाेलन करण्यात अाले त्यात मी पुढे हाेताे. ते फक्त अांदाेलन हाेते, ताे काही प्राणघातक हल्ला नव्हता. जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे, भगवतगीता यावर अाक्षेपार्ह लिखान साेशल मिडीयावर केले हाेते. त्यावर मी माझ्या ब्लाॅगमध्ये लिहीले हाेते. त्या अाकसापाेटी अाव्हाड यांनी ते ट्विट केले अाहे. अाव्हाडांच्या विराेधात मी पुणे सायबर क्राइमकडे तक्रार दाखल केली अाहे. तसेच दत्तवाडी पाेलिस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार दाखल करणार अाहे. येत्या दाेन तीन दिवसात त्यांच्याविराेधात मी अब्रुनुकसानीचा दावाही दाखल करणार अाहे. 

Web Title: allegations between jitendra awhad and dhiraj ghate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.