युतीकडून मुस्लिम, धनगरांची फसवणूक - राष्ट्रवादीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 02:15 AM2018-12-21T02:15:05+5:302018-12-21T02:15:12+5:30

राष्ट्रवादीचा आरोप : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध

Alliance of Muslims, Dhangars fraud - NCP's allegations | युतीकडून मुस्लिम, धनगरांची फसवणूक - राष्ट्रवादीचा आरोप

युतीकडून मुस्लिम, धनगरांची फसवणूक - राष्ट्रवादीचा आरोप

Next

पुणे: भारतीय जनता पार्टी, शिवसेना सरकारने राज्यातील सर्वसामान्य जनतेची फसवणूक करण्याबरोबरच मुस्लिम व धनगर समाजाचीही घोर फसवणूक केली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. सरकारच्या
विरोधात या वेळी घोषणा देण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष चेतन तुपे, राज्य प्रवक्ते अंकुश काकडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक गफूर पठाण, प्रदीप गायकवाड, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके तसेच पक्षाचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. पक्षाचे झेंडे, भाजपाशिवसेना सरकारचा निषेध करणारे फलक हातात घेऊन बराच वेळ घोषणा देण्यात आल्या.
पक्षाचे युवक अध्यक्ष राकेश कामठे, ओबीसी अध्यक्ष संतोष नांगरे, रईस सुंडके, प्रदीप
देशमुख, स्वप्निल दुधाणे यांच्यासह अनेक जण मोर्चात सहभागी झाले होते.

सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मुस्लिम व धनगरांना आरक्षण देणार असल्याचे सांगितले होते. आता सत्ता येऊन चार वर्षे झाली. राज्य सरकारने त्याबाबत काहीही केलेले नाही. साधा प्रस्तावही यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठवलेला नाही. या सरकारला कोणतेही काम करायचेच नाही, फक्त आश्वासनेच देत त्यांचे नेते सगळीकडे फिरत असतात. त्यामुळे आता जनतेचा भ्रमनिरास होत चालला आहे.
- चेतन तुपे

जाहीरनाम्यातील किती आश्वासने पूर्ण केली हे या सरकारने सांगावे. मोठमोठ्या घोषणा करायच्या व त्यानंतर विसरून जायचे असेच गेली चार वर्षे सुरू आहे. या दुटप्पी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.
- अंकुश काकडे
सरकारने मुस्लिम आरक्षणाची बाजू न्यायालयात नीट मांडली नाही. त्यांना काही द्यायचेच नाही हे त्यावरून सिद्ध होते. यापुढे त्यांच्या कोणत्याही भूलथापांना समाज बळी पडणार नाही.
- गफूर पठाण, नगरसेवक

Web Title: Alliance of Muslims, Dhangars fraud - NCP's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.