कडूस सहकारी सोसायटकडून पीक कर्जाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:11 AM2021-04-23T04:11:32+5:302021-04-23T04:11:32+5:30
यावेळी सचिव दादासाहेब कल्हाटकर, विभागीय अधिकारी विलास भास्कर, विकास अधिकारी मुरलीधर ढोरे, मॅनेजर रघुनाथ मुळूक, बाळासाहेब धायबर, नामदेव गारगोटे, ...
यावेळी सचिव दादासाहेब कल्हाटकर, विभागीय अधिकारी विलास भास्कर, विकास अधिकारी मुरलीधर ढोरे, मॅनेजर रघुनाथ मुळूक, बाळासाहेब धायबर, नामदेव गारगोटे, कोंडीभाऊ गारगोटे, अमोल धायबर, शंकर ठोंबरे, व्हाइसचेअरमन चंद्रकांत पारधी, दामोदर बंदावणे, बाजीराव शिंदे ,साईनाथ गारगोटे, ज्ञानेश्वर ढमाले पाटील, सुदाम ढमाले,अशोक गारगोटे,साहेबराव धायबर, गोविंद वारे, संगीता अरगडे, विमला कालेकर,सुधीर जाधव, लक्ष्मण मुसळे आदी उपस्थित होते.
खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील व जि.प.सदस्य अशोक शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार पाहणारी आणि खेड तालुक्यातील पश्चिमेकडील भागातील शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची एकमेव आणि विश्वासार्ह संस्था म्हणून कडूस विविध कार्यकारी सहकारी कडूस सोसायटीचा लौकिक आहे.खरीप हंगाम तोंडावर आलाअसून, सभासद शेतकऱ्यांना तत्काळ भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. सतत दोन- तीन वर्षे आर्थिक चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना ह्या सहकारी संस्थेने मदतीचा हात दिला असल्याचे चेअरमन पंडित मोढवे यांनी यावेळी सांगितले.