रहाटणीत खोट्या नोटांचे वाटप?
By admin | Published: February 18, 2017 03:19 AM2017-02-18T03:19:50+5:302017-02-18T03:19:50+5:30
रहाटणीतील एका सराफाच्या दक्षतेमुळे खोट्या नोटा चलनात आल्याचे लक्षात आले. काही महिला खोट्या नोटा घेऊन सराफाच्या दुकानात
रहाटणी : रहाटणीतील एका सराफाच्या दक्षतेमुळे खोट्या नोटा चलनात आल्याचे लक्षात आले. काही महिला खोट्या नोटा घेऊन सराफाच्या दुकानात खरेदीसाठी गेल्या. त्यांनी दोन हजार दोनशे रुपयांची चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली. सराफाला दोन हजारांच्या दोन नोटा दिल्या. मात्र त्या खोट्या असल्याचे सराफाने सांगताच त्यांनी काढता पाय घेतला.
सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने मतदाराला प्रभावित करण्यासाठी काही उमेदवार पैसे वाटत असल्याची चर्चा आहे. मात्र अशा खोट्या नोटा कोणी वाटल्या, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. केवळ आश्वासनेच खोटी नाहीत, तर नोटासुद्धा खोट्या टेकवल्या जात असल्याने मतदारही संभ्रमात पडले आहेत. रहाटणी येथील रामनगरमध्ये शहाणे ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानात चांदीचे पैंजण खरेदी करण्यासाठी काही महिला गेल्यानंतर प्रकार उघडकीस आला.(वार्ताहर)
सध्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा टप्पा असून, धामधूम जोरात सुरू आहे. मतदाराला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक कल्पना उमेदवारांकडून लढविल्या जात आहेत. रहाटणी, काळेवाडी परिसरातील कष्टकरी कामगारांची फसवणूक केली जात आहे. या प्रभागात उमेदवार पैसे वाटप करत असल्याची चर्चा आहे. एका मतासाठी पाच हजारांपर्यंत किंमत मोजली जात आहे.