उद्योगांना आवश्यक सहित्याची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:09 AM2021-04-17T04:09:49+5:302021-04-17T04:09:49+5:30
बारामती : उद्योगांना आवश्यक साहित्याची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली ...
बारामती : उद्योगांना आवश्यक साहित्याची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यानुसार राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत निर्यातक्षण व कृषीपूरक उद्योगांना सवलत दिली आहे. सदर उद्योग व त्यांना पुरवठा करणारे लघुद्योगही सुरु राहणार आहेत, या उद्योगांचे उत्पादन सुरळीत होण्यासाठी त्यांना आवश्यक स्टील मटेरियल, हार्डवेअर, वेल्डिंग मटेरियल, पेंट, इलेक्ट्रिकल आदींची दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत.
या उद्योगांकडे कच्च्या मालाचा फारसा साठा नसतो, त्यांना अनेक बाबी दैनंदिन खरेदी करूनच उत्पादन करावे लागते, या पार्श्वभूमीवर ही दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.