"मानाच्या गणपतींच्या आधी मिरवणुकीला परवानगी द्या", पुण्याच्या पूर्व भागातील मंडळांची न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:59 PM2022-08-30T12:59:15+5:302022-08-30T12:59:34+5:30

लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पाच गणपती मंडळच जातील व त्यानंतरच इतरांनी जावे हा रूढी-परंपरा व प्रथेचा भाग म्हणजे कायदा नाही

Allow the procession before the Lord Ganesha Petition in the court of the mandals of the eastern part of Pune | "मानाच्या गणपतींच्या आधी मिरवणुकीला परवानगी द्या", पुण्याच्या पूर्व भागातील मंडळांची न्यायालयात याचिका

"मानाच्या गणपतींच्या आधी मिरवणुकीला परवानगी द्या", पुण्याच्या पूर्व भागातील मंडळांची न्यायालयात याचिका

googlenewsNext

पुणे : विसर्जन मिरवणुकांच्या वेळी लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पाच गणपती मंडळच जातील व त्यानंतरच इतरांनी जावे हा रूढी-परंपरा व प्रथेचा भाग म्हणजे कायदा नाही. त्यामुळे इतर लहान गणपती मंडळांना विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असणारी बंधने म्हणजे बेकायदा व संविधानातील कलम १९ नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे, असा आरोप करणारी याचिका बढाई समाज तरूण मंडळ व पांगुळ आळी गणेश मंडळाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची १३० वर्षांची परंपरा आहे. मुख्य विसर्जन मिरवणूक महात्मा फुले मंडईतून सुरू होते. लक्ष्मी रस्तामार्गे डेक्कन जिमखान्यावर मुठा नदीपात्रात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करून मिरवणूक संपते. मानाचा पहिला श्री कसबा गणपती पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात करतो. त्यानंतर मानाचे ४ गणपती एकापाठोपाठ एक मिरवणुकीत सहभागी होतात. सकाळी १० वाजता मिरवणूक सुरु झाल्यावर दुपारी ४ वाजेपर्यंत इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्याने पुढे जाता येत नाही. चार नंतर लक्ष्मी रस्त्याची इतर मंडळे एका रांगेत सोडली जातात. दरवर्षी सुमारे २५ ते ३० तास मिरवणूक चालते. मात्र, याचा फटका मानाचे गणपती वगळता इतर गणपती मंडळांना विशेषत: पूर्व भागातील मंडळांना पुरेसा वेळा मिळत नाही. असे त्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. 

मानाच्या गणपतींच्या आधी ज्या मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढायची असेल त्यांना पोलीस आयुक्तांनी परवानगी द्यावी व तशी सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये शहरातील मानाच्या गणपती मंडळांनाच प्रशासन प्राधान्य देते, अनेकदा व दरवर्षी विनंत्या करूनही पोलीस ऐकून घेत नाहीत. पहिल्या पाच मानाच्या गणपती मंडळांद्वारे इतर मंडळांना तुच्छतेची वागणूक देण्यात येते, असेही याचिकेत नमूद आहे.

Web Title: Allow the procession before the Lord Ganesha Petition in the court of the mandals of the eastern part of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.