आलेगाव पागा परिसरात पेरणीची लगबग, परंतु पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:49+5:302021-06-17T04:08:49+5:30

या भागात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे शेतकरी कमी कालावधीची पिके शेतात घेत आहे. ऊस पिकासाठी वर्षभर पाण्याची आवश्यकता असते. ...

Almost sowing in Alegaon Paga area, but waiting for rain | आलेगाव पागा परिसरात पेरणीची लगबग, परंतु पावसाची प्रतीक्षा

आलेगाव पागा परिसरात पेरणीची लगबग, परंतु पावसाची प्रतीक्षा

Next

या भागात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे शेतकरी कमी कालावधीची पिके शेतात घेत आहे. ऊस पिकासाठी वर्षभर पाण्याची आवश्यकता असते. परंतु चासकमानचे आवर्तन हे या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी कडधान्य पिके घेत आहे शेतकरी पारंपरिक पद्धतीने बैलजोडीने पेरणी न करता ट्रॅक्टरला काकर जोडणी व पेरणी पाभर बांधून पेरणी करत आहे कमी कालावधीत ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करत असल्यामुळे शेतकरीवर्गाची शेतातील कामे ताबडतोब होत आहे. परंतु या भागात अजूनही दमदार व जोरदार पावसाची प्रतीक्षा असल्यामुळे शेतकरीवर्ग शेती उपयोगी वस्तू साहित्य त्याची जोडणी बांधणी करत आहे, जोरदार पाऊस झाल्यास या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरणी करत असल्याचे मत शेतकरी राहुल वाघचौरे यांनी सांगितले.

Web Title: Almost sowing in Alegaon Paga area, but waiting for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.