साथरोग नियंत्रण की डास पैदास केंद्र?

By admin | Published: September 17, 2014 12:15 AM2014-09-17T00:15:01+5:302014-09-17T00:15:01+5:30

महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या परिसरातच तब्बल 25 ते 3क् ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास ठिकाणो आढळून आली आहेत.

Along with Dog Breeding Centers of Disease Control? | साथरोग नियंत्रण की डास पैदास केंद्र?

साथरोग नियंत्रण की डास पैदास केंद्र?

Next
पुणो : साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी तब्बल दीडशे वर्षापूर्वी ब्रिटिशांनी सुरू केलेल्या महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या परिसरातच तब्बल 25 ते 3क्  ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास ठिकाणो आढळून आली आहेत. रुग्णालयाच्या आवारातील महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाच्या भंगारात पडलेल्या सामानात ही डासांची पैदास झाली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.  एकीकडे नागरिकांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून दंड वसूल करणारा आरोग्य विभाग 
आता पालिकेच्याच जागेत डासांची पैदास आढळल्याने कोणावर कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून, गेल्या दोन महिन्यांत या आजाराने दोघांचा मृत्यू झाला आहे. तब्बल दोन हजारहून अधिक नागरिकांना या आजाराची लागण झाली आहे. तर दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून शहरात डेंग्यू हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत चार सहायक आरोग्य प्रमुखांकडे शहरातील डेंग्यू नियंत्रणाची जबाबदारी दिली आहे. यातील एका सहायक आरोग्य प्रमुखांच्या पथकाने आज नायडू रुग्णालयाच्या परिसराची पाहणी केली. या वेळी या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागात (कोठी विभाग) अस्ताव्यस्त भंगाराच्या साहित्यात एक दोन नव्हे, तर तब्बल 25 ठिकाणी डासांची पैदास 
आढळून आली आहे. त्यामुळे 
साथरोगाचे नियंत्रण असलेले 
नायडू रुग्णालयच डासांचे पैदास 
केंद्र बनले आहे. या ठिकाणचे 
काही कर्मचारीही गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)
 
आता कोणाला बजावणार नोटीस?
जिथे डासांची पैदास आढळते, त्या ठिकाणची मालकी असलेल्या नागरिकांवर पालिकेकडून खटला दाखल करण्यात येतो. तसेच त्यांना नोटीस बजावून दंड वसूल केला जातो. त्यामुळे आता पालिकेच्याच मिळकतीत डेंग्यूच्या डासांची पैदास आढळून आली असून, आरोग्य विभाग कोणावर खटला दाखल करणार, असा सवाल केला जात आहे. तसेच यास जबाबदार अधिका:यांकडून दंड वसूल करणार का असा प्रश्नही आहे.
 
मध्यवर्ती भांडार विभाग हा पालिकेचा विभाग असला तरी, त्याची जबाबदारी विभागप्रमुख श्रीनिवास कंदूल यांची आहे. त्यामुळे याची जबाबदारीही त्यांचीच असल्याने त्यांना नोटीस बजाविली जाईल. तसेच  त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल. 
- डॉ. एस. टी. परदेशी, 
प्रभारी आरोग्यप्रमुख
 
च्शहरात महापालिकेची सुमारे 15 क्षेत्रीय कार्यालये आहेत. या ठिकाणीही पालिकेचे मोठय़ा प्रमाणात भंगार साठलेले असून, त्या ठिकाणीही डासांची पैदास ठिकाणो असल्याची शक्यता आहे. मात्र, आपल्याकडे सारे काही आलबेल असल्याचा आव आणत क्षेत्रीय कार्यालयांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. 
च्काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात डासांची पैदास केंद्रे आढळून आली होती. आता नायडू कोठीच्या परिसरात डासांची पैदास ठिकाणो आढळल्याने आरोग्य विभागाकडून पालिकेच्या ठिकाणांचीही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

 

Web Title: Along with Dog Breeding Centers of Disease Control?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.