प्रबोधनाबरोबरच मानवसेवा व्रताची जपणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 02:47 AM2017-08-07T02:47:51+5:302017-08-07T02:47:51+5:30

भगवान महावीर स्वामींचे तत्त्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचविणे, प्रसार करणे, सामाजिक जाणीव ही भावना कायम ठेवून उपक्रम राबविणे, मानवसेवेचे काम करण्याचे काम जैन कॉन्फरन्सच्या वतीने केले जात आहे. साधू-संत सेवा आणि ज्ञानप्रकाश योजना, जीवदया योजनेच्या माध्यमातून समाज सक्षमीकरण केले जात आहे.

 Along with enlightenment, the service of human service vow of the bride | प्रबोधनाबरोबरच मानवसेवा व्रताची जपणूक

प्रबोधनाबरोबरच मानवसेवा व्रताची जपणूक

googlenewsNext

भगवान महावीर स्वामींचे तत्त्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचविणे, प्रसार करणे, सामाजिक जाणीव ही भावना कायम ठेवून उपक्रम राबविणे, मानवसेवेचे काम करण्याचे काम जैन कॉन्फरन्सच्या वतीने केले जात आहे. साधू-संत सेवा आणि ज्ञानप्रकाश योजना, जीवदया योजनेच्या माध्यमातून समाज सक्षमीकरण केले जात आहे. देशभरात १३ प्रांतांच्या माध्यमातून सुमारे दोन हजार सेवक काम करीत आहेत. तसेच युवक आणि महिला शाखेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, असे मत श्री आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्टÑीय महामंत्री प्रा. अशोक पगारिया यांनी व्यक्त केले.

जैन कॉन्फरन्सची स्थापना, उद्देश याबद्दल प्रा. पगारिया म्हणाले, ‘‘एकशे अकरा वर्षांची परंपरा असणारी श्री आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स ही संस्था आहे. देशभरात या संस्थेचे ६५ हजार सदस्य आहेत. जैन समाजामध्ये स्थानकवासी, मंदिर, तेरापंथी, दिगंबर पंथ आहेत. त्यात पूजा आणि भक्ती करण्याच्या पद्धतीत फरक आहे. मात्र, विचारधारा आणि प्रवाह एकच आहे. भगवान महावीर स्वामींचे तत्त्वज्ञान पोहोचविण्याचे काम जैन कॉन्फरन्सच्या माध्यमातून केले जात आहे. देशभरात सुमारे ४२ लाख जैन बांधव आहेत. त्यांपैकी दहा लाख नागरिक स्थानकवासी आहेत. समाजातील नागरिकांमध्ये एकजूट व्हावी. गरजूंना मदतीचा हात मिळावा, समाजातील विविध घटकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने या संस्थेचे काम सुरू असते.
१९०६ मध्ये या संस्थेची स्थापना झाली. दिल्लीत मुख्यालय आहे, तर देशभरात १३ प्रांत आहेत. या माध्यमातून देशभर कार्य सुरू असते. समाजप्रबोधन आणि महावीरवाणीचा प्रसार हे प्रमुख उद्दिष्ट आहे. श्रमण संघाचे मुख्य आचार्य डॉ. शिवमुनीजी यांच्या नेतृत्वाखाली युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साधू-साध्वी परिवार काम करीत आहे. तसेच महाराष्टÑ प्रवर्तक म्हणून कुंदनऋषीमहाराज कार्यरत आहेत.
समाजातील गरजवंतांना मदत, निराधार महिलांना पेन्शन योजना, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, तसेच महिलांनाही मानवसेवा या उद्देशाने मदत केली जाते. वर्षभरात देशातील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे. तसेच सुमारे अडीचशे महिलांना शिलाई मशिनचे वाटप केले आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले आहे.’’
सामाजिक उपक्रमांबद्दल पगारिया म्हणाले, ‘‘ज्ञानप्रकाश योजनेअंतर्गत वाचनसंस्कृती वाढीस लावण्यासाठी जैनप्रकाश हे पाक्षिकही सुरू आहे. तीन योजनांवर काम केले जाते. त्यातील पहिली योजना साधू-संतसेवा. देशभरात सुमारे ११०० साधू-साध्वींचे देशभरातील चातुर्मासाचे आयोजन करणे, आहार-विहार व्यवस्थेसाठी मदत करणे, यासाठी कॉन्फरन्स मदत करते. ज्ञानप्रकाश योजनेंतर्गत धार्मिक पुस्तकांची निर्मिती, भगवान महावीर स्वामींच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धांचे आयोजन केले जाते. जीवदया योजनेंतर्गत विविध भागांतील गोशाळांना मदत, प्राणिमात्रांसाठी चारा उपलब्ध करून देणे, पक्षी-प्राणी यांना अन्न उपलब्ध करून देणे हे उपक्रम आयोजित केले जातात. युवा आणि महिला शाखाही कार्यरत आहेत. संस्थेचे काम सर्वदूर पोहोचविण्यासाठी अध्यक्ष मोहनलाल चोपडा, पारस मोदी, अविनाश चोरडिया, विलास लोढा, केसरीमल बुरड, युवाध्यक्ष शशिकुमार कर्नावट, महिलाध्यक्ष रुचिरा सुराणा कार्यरत आहेत. मानवसेवा योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. शिवमुनीजी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिनिमित्त रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला. पंचाहत्तर हजार नागरिकांनी उपक्रमात सहभाग घेतला. त्यातून सुमारे ८३ हजार युनिट रक्त जमा झाले. एक लाखापेक्षा अधिक वृक्षांचे रोपण केले आहे. तसेच गरीब रुग्णांसाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर थेरगाव येथे डायलिसिस सेंटर सुरू केले आहे. वडगाव शेरी येथेही एक केंद्र उभारले आहे. त्याच वेळी नाशिक रोड, खेड, चाकण, मराठवाडा, मालेगाव येथेही डायलिसिस सेंटर उभारण्यात येणार आहेत. मानवसेवेचा यज्ञ असाच अखंडपणे सुरू राहणार आहे.

Web Title:  Along with enlightenment, the service of human service vow of the bride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.