आधीच वाहतूककोंडी त्यात सिग्नलमध्ये बिघाड; बजेटमध्ये सिग्नल दुरुस्तीला निधीच नाही; पुणे महापालिका विसरली

By राजू हिंगे | Published: May 17, 2024 02:59 PM2024-05-17T14:59:17+5:302024-05-17T15:00:56+5:30

पावसाळयात वीजेच्या लंपडावामुळे अनेकदा सिग्नल बंद पडतात, बिघडतात त्यामुळे नागरिक हैराण

already a traffic jam signal failure and no funds in the budget for signal repair Pune Municipal Corporation forgot | आधीच वाहतूककोंडी त्यात सिग्नलमध्ये बिघाड; बजेटमध्ये सिग्नल दुरुस्तीला निधीच नाही; पुणे महापालिका विसरली

आधीच वाहतूककोंडी त्यात सिग्नलमध्ये बिघाड; बजेटमध्ये सिग्नल दुरुस्तीला निधीच नाही; पुणे महापालिका विसरली

पुणे : पुणे शहरातील रस्त्यावर मोठयाप्रमाणत वाहतुक कोंडी होत आहे. त्याने नागरिकांचा रोजचे काही तासाचा वेळ वाहतुक कोंडीत जात आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच पावसाळयात वीजेच्या लंपडावामुळे अनेकदा सिग्नल बंद पडतात. कधी या सिग्नलमध्ये बिघाड होतो. त्यामुळे हे सिग्नल दुरूस्त करावे लागतात. त्यासाठी दरवर्षी सुमारे दोन ते अडीच कोटी रूपये निधी लागतो. मात्र पालिकेच्या २०२४ -२५च्या बजेटमध्ये या कामासाठी निधीची तरतुद करण्याचा विसर लेखा विभागाला पडला आहे. पालिकेच्या विघृत विभागाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर सिग्नल यंत्रणा- दुरुस्तीसाठी तरतूद करून घेण्यासाठी आयुक्तांना पत्र पाठविले आहे.

पुणे शहरात एकूण २५० सिग्नल आहेत. त्यातील १२५ सिग्नल पुणे स्मार्ट सिटी कडून चालवले जातील. बाकी १२५ सिग्नलवर पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिस यांचे नियंत्रण असते. दुरुस्तीचा आणि मनुष्यबळाचा सगळा खर्च महापालिका करते. यासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात 2 ते अडीच कोटींची तरतूद केली जाते. दोन वेगवेगळे टेंडर काढून हे काम केले जाते. अंदाजपत्रकात आरई -13 या यादीनुसार आरई20बी121/आर 13 – 103 या बजेट कोड अंतर्गत पुणे शहरात नव्याने सिग्नल यंत्रणा उभारणे आणि जुने सिग्नल दुरुस्त करणे, यासाठी तरतूद केली जाते. मात्र 2024-25 च्या बजेटमध्ये यासाठी तरतूदच दिसून येत नाही.पावसाळ्याच्या दिवसात शहरातील सिग्नल हमखास बिघडतात. पाऊस आणि वाऱ्याने पोल पडतात. कधीकधी आपोआप दिव्यांची लाईट चालू बंद होते. यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. यावर नियंत्रण ठेवण्याचं काम वाहतूक पोलिस करतात. त्यांच्याकडून तक्रार आल्यानंतर दुरुस्ती केली जाते. यासाठी महापालिकेने 2 जीप उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये ड्राइवर, इंजिनियर आणि पोलिसांचा मदतनीस असतो. महापालिका दरवर्षी दोन टेंडर काढून हे काम करवून घेते. मात्र यंदा बजेटच नसल्याने याबाबत कुठली प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे सिग्नल बंद पडल्यास निधी नसल्यामुळे कामांचा खोळंबा होणार आहे.

सिग्नल दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकात तरतूद नाही, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तात्काळ महापालिका आयुक्तांना तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिले आहे. वर्गीकरणच्या माध्यमातून बजेट उपलब्ध करून घेऊन याची सिग्नल दुरुस्तीची निविदा प्रक्रिया राबविली जाईल प्रक्रिया .– श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता,विघृत विभाग, पुणे महापालिका

Web Title: already a traffic jam signal failure and no funds in the budget for signal repair Pune Municipal Corporation forgot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.