आधीच दुर्दशा, त्यात पट कमी

By admin | Published: October 14, 2015 03:28 AM2015-10-14T03:28:43+5:302015-10-14T03:28:43+5:30

हापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची चर्चा मध्यंतरी झाल्याने अशा शाळा असलेल्या गावांमध्ये पालक आणि विद्यार्थी चिंतेत पडले आहेत

Already the plight, the reduction in fold in it | आधीच दुर्दशा, त्यात पट कमी

आधीच दुर्दशा, त्यात पट कमी

Next

दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची चर्चा मध्यंतरी झाल्याने अशा शाळा असलेल्या गावांमध्ये पालक आणि विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. काही ठिकाणी पुरेशी पटसंख्या व्हावी इतकी लोकसंख्याच नाही. शिक्षकांची उणीव, शाळांची दुर्दशा या नेहमीच्या विषयांचा भार असतानाच या कमी पटसंख्येचा विषयही ऐरणीवर आहे. या साऱ्या विषयाचा विविध भागांत पाहणी करून लोकमतने मांडलेला लेखाजोखा.
खोर : दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांना सध्या जिल्हा परिषदेकडूनच ग्रहण सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अपुरा शिक्षकवर्ग, शिक्षकांवर लादण्यात आलेली शालाबाह्य कामे, पाण्याची टंचाई, सुविधांचा अभाव यामुळे प्राथमिक शाळांचे शिक्षक मेटाकुटीला आले आहेत.
शासनाकडून प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना शालेय पोषण आहाराची देखरेख पाहणे, लोकसंख्या सर्वेक्षण, निवडणूक कालावधीमधील कामे, जनगणना करणे, तालुकास्तरावरती वारंवार मीटिंग या शालाबाह्य कामांमुळे शाळेच्या शैक्षणिक व भौतिक दर्जावर परिणाम होत आहे.
देऊळगाव केंद्रामधील जिल्हा परिषदेच्या शाळानिहाय पटसंख्या पुढीलप्रमाणे : चौधरीवाडी (२0), पाटलाचीवाडी (३१), डोंबेवाडी (४७), खोर गावठाण (१३६), माने- पिसे वस्ती (२८), हरिबाचीवाडी (२७), पिंपळाचीवाडी (४२), देऊळगावगाडा (१00), बारवकरवाडी (७२), कुसेगाव (७0), विजयवाडी (२0), नरसाळ पट्टा (४0), शितोळेवस्ती (३0) अशी पटसंख्या आहे. एकूण ६६३ विद्यार्थी संख्या असलेल्या १३ जिल्हा परिषदेच्या शाळांपैकी पाटलाचीवाडी, डोंबेवाडी, माने-पिसेवस्ती, हरिबाचीवाडी, देऊळगावगाडा या पाच शाळांवर शिक्षकांची पदे गेल्या वर्षापासून रिक्त आहेत. एकाच शिक्षकावर सर्व शालाबाह्य कामे पाहून इयत्ता पहिली ते ४थी पर्यंतचे वर्ग सांभाळण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागामधील या शाळांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी खरी जिल्हा परिषदेची आहे त्यानुसार पाऊले उचलण्याची वेळ आली आहे.
४या केंद्रामधील डोंबेवाडी, देऊळगावगाडा, बारवकरवाडी या तीन शाळा आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त बनल्या आहेत. मात्र जिल्हा परिषद एकीकडे शाळा आएसओ करण्यासाठी धडपड करीत आहे, मात्र जुन्या जीर्ण झालेल्या प्राथमिक शाळांकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न उभा राहिला आहे.
४कारण खोर परिसरामधील चौधरीवाडी, खोरगावठाणमधील या शाळेच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. या शाळांच्या दुरुस्तीच्या संदर्भातील अनेक प्रस्ताव पंचायत समिती दौंड, जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे देऊन वारंवार या संदर्भातील पाठपुरावा केला आहे. याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही ही मोठी खंत आहे.
४एखाद्या चिमुरड्याचा जीव गेल्यावरच जिल्हा परिषद जागी होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. फुटलेली कौले, गळक्या भिंती यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. या बाबींकडे काणाडोळा सध्याच्या परिस्थितीमध्ये केला जात आहे.
४याबाबत माहिती देताना देऊळगावगाडा केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्रकुमार मोरे म्हणाले, की खोर व देऊळगावगाडा परिसरामधील विद्यार्थ्यांच्या पालकांचा सहभाग हा वेळोवेळी शाळेसाठी लाभत असतो. जूनपासून विद्यार्थ्यांसाठी वाचन, लेखन, हस्ताक्षर, चावडी वाचन, गणितीक्रिया यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. या बाबतचा विद्यार्थ्यांचा भौतिक दर्जा उत्कृष्ट आहे. गटविकास अधिकारी संतोष हराळे, गौतम बेलखेडे, विस्ताराधिकारी गोरख हिंगणे यांचे वेळोवेळी शाळेसाठी मार्गदर्शन लाभत असते.बारामती : तालुक्यात ४ शाळांमध्ये दहापेक्षा कमी पटसंख्या आहे, तर ४ शाळांमध्ये केवळ दहाच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याबाबत बारामती पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी नवनाथ वनवे यांनी माहिती दिली. तालुक्यातील सावकारवस्ती येथे ३, भगतवाडी ४, तर भगतवस्ती, बारवकरवस्ती येथे अनुक्रमे ५ आणि ७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर माळवाडी, परिटवाडी, हनुमाननगर, बारवनगर या शाळांमध्ये दहा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. टिळेकरवस्ती, वाबळेवस्ती, नेपतवळण, रसाळवाडी शाळांमध्ये ११ विद्यार्थी शिकत आहेत. माळीमळा, जाधववस्ती, ठोंबरेवस्ती, मानपावस्ती बंगला येथे १२ विद्यार्थी तर देऊळवाडी, मानेकराडेवस्ती, फाळकेवस्ती, शेरेवस्ती, पोंदकुलेवस्ती येथे १३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सावतामाळीनगर, गायकवाड ढोपरेवस्ती येथे शाळांमध्ये १५ विद्यार्थी तर मोढवे, आंबार, शेरेजाधव, येथे १६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खोरेमळा, कुरणेवाडी, जोशीवाडी शाळेत १७ विद्यार्थी शिकत आहेत. याशिवाय गाडीखेल, ढासीवाडी, पाटलूर रसाळवाडी, हगारेवस्ती, जगदाळेवाडी, पठारेवस्ती शाळेत १८ विद्यार्थी शिकत आहेत. शिंदेवाडी, गावडेवस्ती, अहिल्यानगर, उंबरओढा, होळकरवस्ती, शेराचीवस्ती येथे १९ विद्यार्थी तर तांबेवस्ती शाळेत २० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Web Title: Already the plight, the reduction in fold in it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.