रविवारी बँकेत, दूध परत करायला आणि कबुतरांना खायला घालायलाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:12 AM2021-04-22T04:12:01+5:302021-04-22T04:12:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मी ज्या दुकानातून दूध घेतले, त्या दुकानात दूध परत करायला चाललो आहे, रविवार असला ...

Also at the bank on Sundays, to return milk and feed the pigeons | रविवारी बँकेत, दूध परत करायला आणि कबुतरांना खायला घालायलाही

रविवारी बँकेत, दूध परत करायला आणि कबुतरांना खायला घालायलाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मी ज्या दुकानातून दूध घेतले, त्या दुकानात दूध परत करायला चाललो आहे, रविवार असला तरी बँक सुरू आहे, मला बँकेतून मेसेज आला आहे त्यामुळे मी बँकेत पैसे भरायला चाललोय, मी कबुतरांना खायला घालायला जात आहे, लॉकडाऊनच्या काळात पुणेकरांनी घराबाहेर पडण्यासाठी पोलिसांना दिलेल्या कारणांपैकी ही काही कारणे आहेत. पुणेकरांची कल्पनाशक्ती आणि त्यांनी शोधलेल्या नवी नवीन कारणांचा परिचय सध्या पोलिसांना येत आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून पुण्यात संचारबंदी सुरू आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस अडवून चौकशी करतात. त्या वेळी अतिशय मजेशीर कारणे पुणेकरांकडून दिली जात आहे. याबाबत पुणे पोलिसांनी नुकताच एक व्हिडिओ टि्वट केला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दररोज जवळपास ५ हजार नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहे, असे असतानाही पुणेकर विनाकारण शहरात फिरताना आढळून येत आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अतिशय मजेशीर कारणे सांगितली जात आहेत.

ही आहेत कारणे!

दूध परत करायला जात आहे

एकाला विचारले तेव्हा त्याने दूध आणायला जात असल्याचे सांगितले. तेव्हा पोलिसांनी विचारले, तू राहतो कोठे आणि दुधासाठी जातोय कोठे, तुझ्या घराजवळ दूध मिळत नाही का? त्यावर त्याने उत्तर दिले की, मी ज्या दुकानातून दूध घेतले आहे, त्या ठिकाणी ते परत करण्यासाठी जात आहे. दूध परत करायला जाताना कोणी कधी पाहिले आहे का?

रविवारी बँकेत जायचंय

मी बँकेत चाललोय. तेव्हा पोलिसांनी त्याला आठवण करुन दिली की आज रविवार आहे, बँका बंद असतात. तेव्हा त्याने आत्मविश्वासाने सांगितले की, बँक चालू आहे, आताच मेसेज आला, पैसे भरायला चाललोय.

........

पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. असे असताना पुणेकरांनी कारणे न सांगता घरात थांबावे. पोलीस आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची ही चेन ब्रेक करण्यास पोलिसांना सहकार्य करावे.

अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर

Web Title: Also at the bank on Sundays, to return milk and feed the pigeons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.