हुतात्मा कर्णिकांसह स्मारकाचाही विसर
By admin | Published: November 14, 2014 12:44 AM2014-11-14T00:44:50+5:302014-11-14T00:44:50+5:30
स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. स्थळ-फरासखाना. इंग्रजांच्या बॉम्बगोळा कारखान्यातून आणलेले बॉम्ब स्वातंत्र्यसैनिकांना पुरविल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला अटक होते.
Next
पुणो : स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. स्थळ-फरासखाना. इंग्रजांच्या बॉम्बगोळा कारखान्यातून आणलेले बॉम्ब स्वातंत्र्यसैनिकांना पुरविल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला अटक होते. मात्र, आपल्यामुळे अन्य साथीदारांना कैद आणि शिक्षा होऊ नये, यासाठी ती व्यक्ती ‘सायनाइड’ची गोळी घेऊन फरासखान्याच्या पायरीवरच आपले जीवन देशाप्रती अर्पण करते. हुतात्मा भास्कर कर्णिक असे या देशभक्ताचे नाव होते. या घटनेचे साक्षीदार असलेले फरासखान्याजवळील त्यांचे स्मारक आणि त्यांच्या बलिदानाचा आज संपूर्ण शहरालाच विसर पडला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हुतात्मा कर्णिकांचे स्मारक आज अस्वच्छतेच्या आणि कच:याच्या विळख्यात दुर्लक्षित अवस्थेत कसेबसे तग धरून आहे. या स्मारकामधून पर्यटकांना प्रेरणा मिळण्याऐवजी त्याकडे केविलवाण्या नजरेने पाहण्याची वेळ आली आहे. फरासखाना पोलीस चौकीपासून जवळच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या चौकात मजूर अड्डय़ाजवळ हे स्मारक आहे. स्मारकाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पथारी व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. त्यांनी टाकलेला केर-कचराच तुमचे याठिकाणी स्वागत करतो. स्मारकाच्या बाजूला असलेल्या चौथ:यावर पालापाचोळा, सिगारेटचे तुकडे पडलेले असतात. अनेकदा याठिकाणी भिकारी झोपलेले दिसतात. चौथ:यावरच कामगारांना बसण्यासाठी बाकडे टाकण्यात आलेले आहे.
मुख्य स्मारकासमोर असलेली मशालीची ज्योत अत्यंत खराब झाली असून, त्याचे तुकडे पडले आहेत. सकाळच्या वेळी या ठिकाणी कामगारांची गर्दी असते. या ठिकाणी मजूर अड्डा असल्याने कामगारांची वर्दळ असली तरी, स्मारकाचे पावित्र्य जपले जावे, अशी भावना आहे.
1हुतात्मा भास्कर कर्णिक हे इंग्रजांच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये नोकरीला होते. त्यांनी येथून छुप्या मार्गाने बॉम्ब आणून क्रांतिकारकांना दिले. त्यांचे साथीदार नंतर या बॉम्बचे टाईमबॉम्ब बनवत असत. हे टाईमबॉम्ब त्यावेळी गाजलेल्या कॅपिटल थिएटरमध्ये इंग्रजांविरोधात वापरण्यात आले.
2हा खटला सुरू असताना कर्णिक यांनी बॉम्ब छुप्या मार्गाने बाहेर आणल्याचे बॉम्बच्या शेलवरून ओळखले. त्यावरून कर्णिक यांना अटक झाली. मात्र, आपल्या साथीदारांची नावे बाहेर येऊ नयेत, म्हणून कर्णिक यांनी सायनाइडची गोळी खाऊन देहत्याग केला. त्यांच्या स्मरणार्थ 1972मध्ये हे स्मारक बांधण्यात आले होते.