सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे आर्थिक उत्पन्न मिळविण्यासोबतच वीजपुरवठ्याचा पर्याय : सचिन तालेवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:19 AM2021-03-04T04:19:25+5:302021-03-04T04:19:25+5:30
कृषिपंपांच्या वीजबिलांतून थकबाकीमुक्त झालेले श्यामराव गणपत गायकवाड, लक्ष्मण दगडू गायकवाड, लीलाबाई अरुण घुले, केरबा दगडू गायकवाड, वाडेबोल्हाईचे सरपंच दीपक ...
कृषिपंपांच्या वीजबिलांतून थकबाकीमुक्त झालेले श्यामराव गणपत गायकवाड, लक्ष्मण दगडू गायकवाड, लीलाबाई अरुण घुले, केरबा दगडू गायकवाड, वाडेबोल्हाईचे सरपंच दीपक गावडे (मुळशी विभाग) तसेच कृषिपंपांची नवीन वीजजोडणी मिळालेले जिजाबाई साधू येवले, बाळासाहेब विठ्ठल जगताप, नितीन मुरलीधर काजळे, पूजा संभाजी बुट्टे (मंचर विभाग) यांचा महावितरणच्या वतीने सन्मानपत्र व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. .
येथील 'प्रकाशभवन'मध्ये ऊर्जा विभागाच्या 'कृषी ऊर्जा पर्वा'ला पुणे परिमंडलात सुरवात करण्यात आली. कोविड-१९चे नियम पाळून आयोजित या कार्यक्रमात प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, उपमहाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अलोक गांगुर्डे, अधीक्षक अभियंता . राजेंद्र पवार, श्री. शंकर तायडे, महाव्यवस्थापक (आयटी). एकनाथ चव्हाण यांच्यासह जुन्नर व हवेली तालुक्यातील प्रातिनिधिक लाभार्थी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
कृषिपंपाच्या वीजबिल थकबाकीमुक्तीसह पाहिजे तेव्हा नवीन वीजजोडणी तसेच बिल भरलेल्या रकमेतील ६६ टक्के हक्काच्या निधीतून गाव, जिल्ह्यातील वीज यंत्रणेच्या विकासाला हातभार लावण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. या ऐतिहासिक धोरणाचा व संधीचा सर्व शेतकऱ्यांनी जरुर फायदा घ्यावा. त्याबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी 'कृषी ऊर्जा पर्व' सुरु करण्यात आले आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी केले तर कार्यकारी अभियंता किरण सरोदे यांनी आभार मानले. यावेळी कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंदेले, हेमचंद्र नारखेडे, संतोष गरूड तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
पुणे परिमंडलाच्या 'कृषी ऊर्जा पर्वा'च्या कार्यक्रमात थकबाकीमुक्त व नवीन वीजजोडणी मिळालेल्या शेतकऱ्यांचा प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या वेळी मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांची उपस्थिती होती.
--