Accident: वडील जाऊ नको सांगत असतानाही तो गेला अन् अपघातात जीव गमावला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 02:38 PM2022-04-11T14:38:19+5:302022-04-11T14:38:26+5:30

वडीलांचे न एकता धनकवडीतील एक तरुण आपल्या मित्रांसोबत फिरायला म्हणून मुंबई च्या दिशेने गेला आणि त्याचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला

Although his father told him not to go he went and lost his life in an accident in pune | Accident: वडील जाऊ नको सांगत असतानाही तो गेला अन् अपघातात जीव गमावला

Accident: वडील जाऊ नको सांगत असतानाही तो गेला अन् अपघातात जीव गमावला

googlenewsNext

पांडुरंग मरगजे

धनकवडी : आईवडील हेच आपले खरे हित चिंतक असतात, दैवत असतात. ते वेळोवळी आपल्याला हिताच्या चार गोष्टी सांगत असतात. परंतु आपल्या वडीलांचे न एकता धनकवडीतील एक तरुण आपल्या मित्रांसोबत फिरायला म्हणून मुंबई च्या दिशेने गेला आणि त्याचा दुर्दैवी अपघातीमृत्यू झाला मोहनीश विश्वकर्मा असे या तरुणाचे नाव आहे. 

मोहनीश संगम विश्वकर्मा हा धनकवडी येथे राहणारा महाविद्यालयीन तरुण. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गहुंजे जवळ शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास मोटार व ट्रक अपघातात चार विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये धनकवडी मधील मोहनिश संगम विश्वकर्माचा समावेश होता. वडील त्याला मित्रांसोबत जाऊ नको असे सांगत असतानाही तो मित्रांसोबत गेला आणि त्याचे निधन झाले, हा त्यांच्या कुटुंबीयांसठी मोठा धक्का होता. मोहनीशच्या पाठीमागे आई, वडील आणि नववीत शिकणारी बहीण असा परिवार आहे. 

मोहनीश बीबीएच्या दुसरा वर्षात शिकत होतो, तो माॅडर्न काॅलेजचा विद्यार्थी आहे. वय  केवळ २० वर्षे ! अलिकडेच फेब्रुवारी महिन्यात मोहनीशचा २० वा वाढदिवस त्याच्या कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला होता. 

मोहनीशचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता. त्यामुळे सर्व मित्रांसोबत त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याला पोहण्याचा छंद होता. मोहनीश जरी बीबीए करत असला तरी त्याला अँटोमोबाईलची खूप आवड होती आणि या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार सुद्धा होता.

तरुणांनी आई-वडिलांचे ऐकले पाहिजे

अलीकडे तरुणाई मध्ये वेगाची नशा आहे. मोहनीशचा मित्र प्रचंड वेगाने गाडी चालवत असताना सर्विस रस्त्या वरील ट्रक पाहून त्याचा ताबा कारवरील ताबा सुटला आणि जवळपास ५० मीटरहून अधिक अंतरावरुन ब्रेक लाऊन सुद्धा गाडी ट्रकला धडकली. मोहनीशचे डोके मागील रेस्टवर आपटल्याने मेंदुला तिव्र इजा पोहचली. (हा केवळ प्रचंड वेगाचा परिणाम म्हणावा लागेल.) परंतु शरिरावर साधा ओरखडा ही नव्हता. मोहनीशने वडिलांचे ऐकले असते तर ? आज ही वेळ आली नसती. तरुणांनी वेगाच्या आहारी जाऊ नये. आई-वडिलांचे ऐकले पाहिजे, असे या अपघातातून सावरत असताना मोहनिश चे वडील संगम विश्वकर्मा म्हणाले.

Web Title: Although his father told him not to go he went and lost his life in an accident in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.