२८ वर्षांनंतर भेटले माजी विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:10 AM2021-03-06T04:10:08+5:302021-03-06T04:10:08+5:30
२८ वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होणाऱ्या ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे विज्ञान विषयाचे शिक्षक ...
२८ वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होणाऱ्या ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे विज्ञान विषयाचे शिक्षक श्रीराम भणगे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ साजरा करण्यात आला. विज्ञान विषयाचे ज्ञानदानाचे काम गेली ३३ वर्षे केले आहे.
दुर्गम डोंगरी भागातील चिखलगाव, रावडी, कर्नावड, टिटेघर येथील विद्यार्थी स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आले. त्यांच्या वर्गाला शिकवणाऱ्या श्रीराम भणगे, रवींद्र पवार, विजय चंद्रस, सुरेश वाडकर, मारुतराव धोंडे आणि दिनकर शिवतरे यांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले.
यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अनेक वर्षांनंतर गाठीभेटी झाल्यामुळे काही विद्यार्थी भावनिक होऊन आपले मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी रवींद्र दळवी, मोहनराव बांदल-सरपंच रावडी, गिरीश धोंडे, महानंद, संतोष, दशरथ, संगीता गोळे, सुरेखा, वंदना, तृप्ती दळवी, शोभा, नंदा मोरे, नंदा, सुखदेव, संजय, शिवाजी, शशिकांत, ज्ञानेश्वर, जगन्नाथ यांसह इतर माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुमिलिंद मेहेंदळे, चिखलगावचे सरपंच सुरेशबापू धोंडे, उपसरपंच मनीषा कुंभार, शिक्षक शशिकांत कुडपणे, अमित साबळे, आनंदा धोंडे, प्रा. हनुमंत कुडपणे, शिक्षिका शिनगारे, अंदोरे, देशमाने नांदूलकर आणि ओव्हाळ उपस्थित होते. प्रास्ताविक रवींद्र दळवी शेठ यांनी केले तर सूत्रसंचालन गोरखनाथ अधिकारी यांनी केले. आभार कमल कोंढाळकर यांनी मानले.
२८ वर्षांनंतरचे माजी विद्यार्थी व शिक्षक
छाया - स्वप्निलकुमार पैलवान