माजी विद्यार्थ्यांनी शाळेला बांधून दिले डिजिटल वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:10 AM2021-07-25T04:10:15+5:302021-07-25T04:10:15+5:30
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण विद्या मंदिराच्या १९८० सालच्या इयत्ता चौथीच्या व पृथ्वीराज कपूर मेमोरियल ...
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण विद्या मंदिराच्या १९८० सालच्या इयत्ता चौथीच्या व पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या १९८६ सालच्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला आहे. या दोन्ही डिजिटल वर्गाचे हस्तांतरण हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, स्थानिक शिक्षण सल्लागार समितीचे अध्यक्ष सुभाष काळभोर, प्राचार्य एस. एम. गवळी, सावंत सर, केंद्रप्रमुख रोहिदास मेमाणे, तत्कालीन शिक्षकवृंद आणि माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी म्हणाले की, जीवनातील प्रत्येक क्षेत्रात डिजिटलायझेन करण्याची गरज आहे. जेवढे डिजिटलायझेशन होणार, तेवढे काम चोख करावे लागणार आहे. कारण ते सगळ्यांपर्यंत पोहचणार आहे. त्यातील चुका समाजाला शोधता येणार आहे, त्याची नोंद होणार आहे. त्यामुळे ते काम अभ्यासपूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढणार आहे.
३५ वर्षांनंतर सर्व मित्र मैत्रिणी व शिक्षक भेटल्यामुळे सर्व आनंदीत झाले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील व शिक्षकांनी त्यावेळी शिकवताना आलेले कडू गोड अनुभव सांगितले. त्यामुळे अधूनमधून हास्याची कारंजी उडत होती. या वेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांच्या तत्कालीन शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
या वेळी सुभाष काळभोर, तत्कालीन शिक्षक खोत, पोमण, माने, नदाफ यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर कुमावत यांनी तर सूत्रसंचालन कल्पना मुळे बोरकर यांनी केले. उपस्थितांचे आभार सूर्यकांत गवळी यांनी मानले.
--
कोट
काळानुरूप शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. डिजिटल वर्ग करणे ही काळाची गरज आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी डिजिटल वर्ग करणे ही अतिशय स्तुत्य बाब आहे. जे आपल्याला मिळाले नाही ते आपल्या पुढील पिढीला देण्याची माजी विद्यार्थ्यांची प्रवृत्ती वाखाणण्याजोगी आहे. शाळेतील प्रत्येक बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी असे काम केले तर सर्वच शाळा आगामी काळात डिजिटल होतील.
- कल्याणराव विधाते
--
फोटो : २४ लोणी काळभोर माजी विद्यार्थी
फोटो ओळी : माजी विद्यार्थ्यांनी शाळेला बांधून दिलेल्या डिजिटल वर्गखोल्याच्या लोकार्पणप्रसंगी बोलताना सहा आयुक्त कल्याणराव विधते. मंचावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, प्राचार्य एस. एम. गवळी, शिक्षक व माजी विद्यार्थी.
240721\24pun_4_24072021_6.jpg
फोटो : २४ लोणीकाळभोर माजी विद्यार्थीफोटो ओळी : माजी विद्यार्थ्यांनी शाळेला बांधून दिलेल्या डिजिटल वर्गखोल्यच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना सहा आयुक्त कल्याणराव विधते. मंचावर वरीष्ठ पोलिस निरिक्षक राजेंद्र मोकाशी, प्राचार्य एस एम गवळी, शिक्षक व माजी विद्यार्थी