शिक्षकांच्या लसीकरणासाठी माजी विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:14 AM2021-09-17T04:14:27+5:302021-09-17T04:14:27+5:30
कोरोनाकाळात महाविद्यालयातील जवळपास २५०० विद्यार्थ्यांना विविध विषयाच्या २५ ते ३० ऑनलाईन कार्यशाळा घेऊन उत्तम मार्गदर्शन केले. या कार्यशाळा ...
कोरोनाकाळात महाविद्यालयातील जवळपास २५०० विद्यार्थ्यांना विविध विषयाच्या २५ ते ३० ऑनलाईन कार्यशाळा घेऊन उत्तम मार्गदर्शन केले. या कार्यशाळा आयोजनात जैवतंत्रज्ञान विभाग आघाडीवर होता. या विभागात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने अभ्यासक्रमातील शैक्षणिक बाबींवर प्रकाश टाकून भविष्यातील संशोधनासाठी, स्पर्धापरीक्षासाठी व नोकरीसाठी या क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्निया, लॉस एंजलिस येथून पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या डॉ. चेतन रावळ याने पदव्युत्तर शिक्षणानंतर परदेशातील विविध विद्यापीठात असणाऱ्या जैवतंत्रज्ञान संशोधनातील संधी या विषयावर उत्कृष्ट प्रबोधन केले. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास अमेरिका येथून सुखबिर कौर, सुजाता वाळुंज हिने ऑस्ट्रेलिया येथून, तर ईरा पाध्ये हिने अमेरिकेतून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धापरीक्षांना कसे सामोरे जायचे याबाबत सविस्तर विवेचन सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.
सिया कामत, डॉ. विलास खरात, डॉ. श्रीकांत पवार, डॉ. विठ्ठल बारवकर, डॉ. मुग्धा लेले, डॉ. पंकज मुंदडा, डॉ. दिगंबर कवतिके, डॉ. हेमल मकानी आदी विविध विषयावर मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट काम करण्याची संधी मिळाली, असे उद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी काढले.
विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांच्यासह विभागप्रमुख डॉ.राजेश शर्मा, डॉ. कल्पना चंद्रमोरे डॉ. तुषार बोरसे, उपप्राचार्य डॉ. काशीद यांनी माजी विद्यार्थ्यांनी कोरोना काळात केलेल्या सहकार्याचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.