समाजभावनेतून गरजूंना सदैव मदतीचा हात द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:20+5:302021-05-20T04:12:20+5:30

आम्ही एकपात्री महाराष्ट्र आणि मराठवाडा मित्र मंडळ यांच्या वतीने लोककलावंत आणि पडद्यामागील तंत्रज्ञांना बुधवारी (दि.१९) जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात ...

Always give a helping hand to the needy out of social feeling | समाजभावनेतून गरजूंना सदैव मदतीचा हात द्यावा

समाजभावनेतून गरजूंना सदैव मदतीचा हात द्यावा

Next

आम्ही एकपात्री महाराष्ट्र आणि मराठवाडा मित्र मंडळ यांच्या वतीने लोककलावंत आणि पडद्यामागील तंत्रज्ञांना बुधवारी (दि.१९) जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्या वेळी गावस्कर बोलत होत्या. आम्ही एकपात्री महाराष्ट्रचे विश्वस्त वंदन राम नगरकर, मराठवाडा मित्र मंडळाचे उपप्राचार्य प्रा. रमेश पंडित, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, आम्ही एकपात्री महाराष्ट्रचे अध्यक्ष मारुती यादव, विश्वस्त अनुपमा खरे, युवा संगीतकार सन्मित वाघमारे उपस्थित होते. ‘शांताबाई’ फेम संजय लोंढे, गायक प्रदीप कांबळे यांच्यासह कलावंत-तंत्रज्ञांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. गावस्कर यांच्या एकलव्य न्यास या संस्थेलाही साहित्याचे वाटप करण्यात आले.

गावस्कर म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. प्रत्येकाने समाजाप्रती जाणीव जागृत ठेवली तर चित्र बदलायला वेळ लागणार नाही.

संजय लोंढे म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत लोककलावंतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. छोटीशी मदतसुद्धा उपजीविकेसाठी मोलाची ठरू शकते.

संस्थेचे अध्यक्ष मारुती यादव यांनी उपक्रमामागील भूमिका विशद केली. वंदन राम नगरकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. अनुपमा खरे यांनी आभार मानले.

Web Title: Always give a helping hand to the needy out of social feeling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.