अमराठी बँक अधिकाऱ्यांमुळे खातेदारांच्या अडचणी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 02:27 AM2019-02-01T02:27:29+5:302019-02-01T02:27:48+5:30
संवाद साधण्यात भाषेचा अडसर; मराठी, हिंदी भाषा प्रशिक्षण देण्याची मागणी
भिगवण : भिगवण परिसरात असणाºया राष्ट्रीयकृत बँकात काम करणाºया अधिकाºयांना मराठी भाषाच येत नसल्यामुळे सर्वसामान्य खातेदारांना याचा त्रास होत आहे. काही अधिकाºयांना तर हिंदी भाषाही समजत नसल्यामुळे सामान्य खातेदारांचा मोठा गोंधळ उठत आहे.
भिगवणसारख्या ग्रामीण भागात व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे बºयाच प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टरमध्ये काम करणाºया बँकांनी आपली शाखा भिगवण परिसरात सुरु केलेली आहे. या बँकांचे खातेदार सर्वसामन्य नागरिक तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. तुलनेने शासकीय योजनेत नोकरी करणाºया खातेदारांचे प्रमाण नगण्य आहे. मात्र या बँकात अधिकारी, कर्मचारी आणि शाखा अधिकारी परराज्यातून आलेला असल्यामुळे त्याला मराठी भाषा बोलता अगर वाचता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर भाषेची अडचण होते. बिल्ट कंपनी आवारात असणाºया बँकेत तर मराठी भाषिकाच्या तुलनेत परराज्यातील कर्मचाºयांचा भरणा असल्यामुळे तसेच त्यांना मराठीच काय हिंदीही समजत नसल्यामुळे खातेदारांना त्यांचाशी बोलताना आणि आपली अडचण सांगताना नाकी नाऊ येत असल्याचे दिसून येते. तर कॅनरा बँक तसेच बडोदा बँक आणि शेतकरी आणि शासकीय अनुदान आणि मदत मिळणाºया महाराष्ट्र बँकेतही परराज्यातील अधिकाºयांचाच भरणा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मराठी भाषिक शेतकरी आणि नागरिक यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
परराज्यातील अधिकारी बोलताना ताठर भूमिका घेत असल्यामुळे काही बँकात भांडणाचे प्रकारही घडत असून असा प्रकार घडल्यास खातेदारावरच गुन्हा दाखल करण्याची भीती घातली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बँकेची शाखा चालू करीत असताना तसेच कार्यान्वित असणाºया बँकामध्ये मराठी भाषिक अधिकाºयाची नेमणूक करावी, अशी मागणी खातेदार करीत आहेत.
बँकिंग सेक्टरमध्ये नियुक्ती होण्यासाठी आयबीपीएस संस्थेच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात आणि या परीक्षेत इंग्रजी भाषेचा वापर प्रामुख्याने केला जातो. परराज्यातील तरुणांचा इंग्रजी भाषेकडील कल अधिकच असतों आणि त्यामुळेच मराठी तरुणाची यातील टक्केवारी कमी प्रमाणात असते त्यामुळे इतर भाषिक तरुणांची बँकिग क्षेत्रात जास्त संख्या असल्याचे जाणकाराने सांगितले.