चाळीस गद्दारांची नव्हे, शिवसेना कडवट शिवसैनिकांची : अंबदास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 10:57 AM2022-09-28T10:57:28+5:302022-09-28T11:04:20+5:30

अंबादास दानवे यांनी लोणावळा शिवसेना संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधला....

Ambadas Danve said Not of forty traitors Shiv Sena is Shiv Sainiks pune latest news | चाळीस गद्दारांची नव्हे, शिवसेना कडवट शिवसैनिकांची : अंबदास दानवे

चाळीस गद्दारांची नव्हे, शिवसेना कडवट शिवसैनिकांची : अंबदास दानवे

Next

लोणावळा : खरी शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची आहे. महाराष्ट्रातील कडवट शिवसैनिकांची आहे. चाळीस गद्दारांची नाही. हा महाराष्ट्र शूरवीरांची भूमी आहे. येथे खंडोजी खोपडे व सूर्याजी पिसाळ यांना स्थान नाही, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबदास दानवे यांनी शिंदे गटावर केला.

लोणावळा येथे मंगळवारी (दि. २७) अंबादास दानवे यांनी लोणावळा शिवसेना संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, सुरेश गायकवाड, शांताराम भोते, युवासेना जिल्हा अधिकारी अनिकेत घुले, तालुका अधिकारी विजय तिकोणे, शैला खंडागळे आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी दानवे म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी मावळात भव्य आक्रोश मोर्चा काढला होता. वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प महाराष्ट्रात आला असता तर दीड-दोन लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. सर्व ठरलेले असताना, प्रकल्प गुजरातला गेला. हे महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचे काम, भाजपा सरकार करीत आहे.

संघटनेचे काम बूथ स्तरावर जाऊन करा, सरकार जेथे चुकेल तेथे रस्त्यावर उतरा. रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी शिवसेना आहे. पूर्वी तलवार घेऊन शिवसैनिक फिरत होते. आता शब्द हीच तलवार आहे. आता लढाई आचार, विचाराची तलावर घेऊन लढायची आहे. मनात आत्मविश्वास ठेवा, तुम्ही जिंकू शकता हा संकल्प करा, असे आवाहन अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केले.

Web Title: Ambadas Danve said Not of forty traitors Shiv Sena is Shiv Sainiks pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.