शंभर देशांचे राजदूत ४ डिसेंबरला ‘सीरम’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:26 AM2020-11-26T04:26:48+5:302020-11-26T04:26:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संपूर्ण जागाचे लक्ष सध्या कोरोनावरील लस तयार करणाऱ्या पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’ आणि ‘जिनोव्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संपूर्ण जागाचे लक्ष सध्या कोरोनावरील लस तयार करणाऱ्या पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट’ आणि ‘जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युल्स’ कंपनीकडे लागले आहे. या लस उत्पादन क्षमतेची पाहणी करण्यासाठी शंभर देशांचे राजदूत ४ डिसेंबरला एका दिवसाच्या पुणे भेटीवर येत आहेत. रोजी एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत असून, हे सर्व राजदूत दोन गटांमध्ये दोन्ही ठिकाणी भेट देणार असल्याची अधिकृत माहिती जिल्ह्याचे राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.
कोरोनावरील लसीचे उत्पादन घेण्याची जगातली सर्वात मोठी क्षमता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटकडे आहे. या कंपनीला हे राजदूत भेट देणार आहेत. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत संशोधन सुरु असलेल्या लशीच्या उत्पादनाचे हक्क ‘सीरम’ने घेतले आहेत. या लशीच्या चाचण्यांचा देशात तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे सर्व राजदूत पुण्यात येत आहेत.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडून आलेल्या दौऱ्यानुसार ४ डिसेंबरला दिल्लीतून एअर फोर्सच्या विमानाने ९८ देशांचे राजदूत लोहगाव विमानतळावर ४ डिसेंबरच्या सकाळी सव्वा दहा वाजता दाखल होतील. रशिया आणि सौदी अरेबियाचे राजदूत मुंबईहून पुण्यात येणार आहेत. यानंतर ही सर्व मंडळी दोन गटामध्ये प्रथम सीरम आणि नंतर जिनोव्हा कंपनीला भेट देणार आहेत. त्याच दिवशी रात्री सव्वाआठ वाजता ही सर्व मंडळी त्याच रात्री सव्वाआठ वाजता त्याच विमानाने दिल्लीला परतणार आहेत.
चौकट
मोदी येणार हे नक्की
राजदूत येणार म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील २८ नोव्हेंबरला ‘सीरम’ला भेट देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र मोदी यांच्या दौऱ्याबद्दलची अनिश्चितता कायम आहे. मोदी यांच्या दौऱ्याचा प्राथमिक कार्यक्रम आला असल्याने त्यांचे पुण्यात येणे नक्की आहे. मात्र ते कधी येणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नसल्याचे नाटेकर यांनी सांगितले.