आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

By admin | Published: April 16, 2015 01:06 AM2015-04-16T01:06:43+5:302015-04-16T01:06:43+5:30

सारनाथ बुद्ध विहारमध्ये नगरसेवक विवेक यादव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडक र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Ambedkar Jayanti celebrated with enthusiasm | आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next

पुणे : सारनाथ बुद्ध विहारमध्ये नगरसेवक विवेक यादव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडक र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विहाराचे अध्यक्ष वसंत कांबळे, उपाध्यक्ष शशिकला कांबळे, विजय गायकवाड उपस्थित होते.
मातोश्री रमाई प्रतिष्ठानच्यावतीने मोरे विद्यालय येथील निळा झेंडा चौकात आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. यावेळी नगरसेवक दीपक मानकर, आरपीआय अध्यक्ष महेंद्र कांबळे, महेश शिंदे, पद्मा शिरसाठ, विलास शिरसाठ, सुनिल वडवेराव, बाबा घोंगडे, संतोष कांबळे उपस्थित होते.
डायस प्लॉट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर दवाखान्यामध्ये मॅटर्निटी होम, ओपीडी तसेच डेंटल मशीनचे राज्यमंत्री समाजकल्याण व न्यायमूर्ती दिलीप कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक डॉ. भरत वैरागे, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, जयप्रकाश पुरोहित, संतोष इंदुरकर, नगरसेविका कविता वैरागे उपस्थित होते. राज्याभिषेक फाऊंडेशनच्यावतीने मुंढवा येथील लोणकर विद्यालय येथे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष प्रमोद जाधव, माजी उपमहापौर सुनिल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जानमहम्मद पठाण, उपपोलीस निरिक्षक कोपरे व सुरेखा घाडगे उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने हडपसर परिसरातील अंध, अपंग, मूक-बधिर मुलांना अन्नदान नेते गंगाधर यादव यांच्या वतीने देण्यात आले.(प्रतिनिधी)

४सुयोगनगर येथे बुद्धविहाराचे भूमिपूजन सरपंच संजीवनी वाघमारे, दगडखाण कामगार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बी.एम.रेगे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर काटके, अध्यक्ष सर्जेराव वाघमारे उपस्थित होते.
४सर परशुरामभाऊ महाविद्यालयच्यावतीने डॉ. जया जगताप यांच्या आम्ही सूर्याच्या मायलेकी या महाराष्ट्रातील दलित कवियित्रींच्या मुलाखती व संशोधन प्रकल्पावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

संविधानाच्या प्रतींचे वाटप
४ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने पुणे स्टेशन परिसरातील बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यास जमलेल्या मान्यवरांना महापालिकेकडून या वर्षी राज्यघटनेच्या संविधानाच्या प्रतींचे वाटप करून अनोखा आदर्श घालून देण्यात आला. यावेळी महापालिकेकडून तब्बल ५०० प्रतींचे वाटप पालकंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सह महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, क्षेत्रीय अधिकारी संदीप ढोले पाटील, स्थानिक नगरसेवक अजय तायडे यावेळी उपस्थित होते.
४ स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळयाच्या परिसरात १४ एप्रिलला मोठया प्रमाणात जनसागर लोटतो. या वेळी येणा-या राजकीय पक्ष, संस्था, संघटना तसेच विशेष मान्यवरांचा महापालिकेकडून दरवर्षी निळे उपरणे आणि स्मृती चिन्ह देण्यात येते.
४मात्र, हे न देता, येणा-या मान्यवरांना संविधानाची प्रत देऊन नवा आदर्श घालून द्यावा अशी मागणी मनसेचे नगरसेवक अजय तायडे यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार, आंबेडकर जयंती निमित्ताने या वर्षीपासून राज्यघटनेची प्रत महापालिकेकडून देण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

Web Title: Ambedkar Jayanti celebrated with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.