राजगुरुनगरमध्ये आंबेडकर जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:10 AM2021-04-15T04:10:06+5:302021-04-15T04:10:06+5:30
सकाळी ८ वाजल्यापासूनच तालुक्यातील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राजगुरूनगर एसटी. बसस्थानका समोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ...
सकाळी ८ वाजल्यापासूनच तालुक्यातील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राजगुरूनगर एसटी. बसस्थानका समोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नागरिक अभिवादन करत होते.
सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती खेड तालुका यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बुद्धवंदना, त्रिशरण, पंचशील घेण्यात आली. यावेळी खेड तालुका उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश गुरव, विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष अशोक कडलग, सचिव विद्याधर साळवे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष वैभव घुमटकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीचे कार्याध्यक्ष संतोष डोळस, उपाध्यक्ष पी. के. पवार, कैलास केदारी, सदस्य विजय घेगडमल, आत्माराम रोकडे, खेड तालुका जनता दल अध्यक्ष बाबा हजारे, भीमज्योत तरुण मंडळाचे अध्यक्ष सचिन अंकुश आदी उपस्थित होते.
दिवसभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी जि. प. सदस्य अरुण चांभारे, सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र पवळे, गौरव भन्साळी व खेड तालुक्यातील अनेक संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांनी हजेरी लावली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दिवसभर शासकीय नियमांचे पालन करून व सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी संपूर्ण दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात खेड पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.