विश्रांतवाडीत आंबेडकर जयंती शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:11 AM2021-04-15T04:11:43+5:302021-04-15T04:11:43+5:30
दरवर्षी संपूर्ण पुणे शहराचे लक्ष आकर्षित करणाऱ्या विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षाप्रमाणे यंदाही ...
दरवर्षी संपूर्ण पुणे शहराचे लक्ष आकर्षित करणाऱ्या विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षाप्रमाणे यंदाही शांततेत साजरा करण्यात आला.
डीजेच्या तालावर मिरवणूक आणि देखावे तसेच रोषणाई आणि आतषबाजीसाठी विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव पुणे शहराचे आकर्षण केंद्र ठरते. या दिवशी मिरवणूक आणि देखाव्यांसाठी संध्याकाळी येथील सर्व रस्ते बंद केले जातात. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणेच हा उत्सव अत्यंत शांततेत साजरा करण्यात आला. सौम्य आवाजात भीमगीते लावण्यात आली होती. मुकुंदराव आंबेडकर या मुख्य चौकात विविध मंडळांतर्फे सर्व बाजूंनी महाकाय फ्लेक्स लावून
महामानवास अभिवादन करण्यात आले .
...................
Photo line
विश्रांतवाडी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील मुकुंदराव आंबेडकर या मुख्य चौकात विविध मंडळांकडून महाकाय फ्लेक्स लावून महामानवास अभिवादन करण्यात आले.