सिद्धेगव्हाण येथे आंबेडकरांच्या विचारांचा आखाडा

By admin | Published: May 9, 2017 03:27 AM2017-05-09T03:27:30+5:302017-05-09T03:27:30+5:30

नवचेतना मित्र मंडळाच्या वतीने सिद्धेगव्हाण येथे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेचे पुणे

Ambedkar's mindset at Siddhevwana | सिद्धेगव्हाण येथे आंबेडकरांच्या विचारांचा आखाडा

सिद्धेगव्हाण येथे आंबेडकरांच्या विचारांचा आखाडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कडूस : नवचेतना मित्र मंडळाच्या वतीने सिद्धेगव्हाण येथे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हाप्रमुख संजयशेठ देखणे यांनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी राजे व संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित अतिशय दुर्मिळ माहितीसह इतिहास स्पष्ट केला़ प्रसंग आणि संदर्भ यांच्या आधारे आपल्या प्रभावी विचारांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले़
सालाबादप्रमाणे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सिद्धेगव्हाण गावी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन असते़ परंतु ग्रामस्थ यात्रा कमिटी सदस्यांनी या वर्षी कुस्त्यांच्या आखाड्याऐवजी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आखाडा भरवून त्यांची जयंती साजरी केली़
कार्यक्रमात जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्या निर्मला पानसरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या़ जिल्हा परिषदेवर त्यांची बहुमताने निवड झाल्याने नवचेतना मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला़
वर्षभरात सिद्धेगव्हाण गावी बुद्धविहार बांधून देण्याचे आश्वासन निर्मला पानसरे यांनी सत्कारप्रसंगी दिले़
या कार्यक्रमांचे आयोजन रमेशजी थोरात, मित्रमंडळाचे सदस्य, खेड तालुक्यातील विविध पक्ष व संघटन कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते़ त्यामध्ये आदर्श सरपंच शशिकांत मोरे, मनोहर भालेराव, गौतम कदम, शिवशांत गायकवाड, रिपब्लिकन अध्यक्ष खेड, दत्ता कांबळे, मा़ महेंद्रनाथ नवरे, देवेंद्र ओव्हाळ, अनिल कांबळे, बापूसाहेब थिटे, सुनंदाताई नाईकनवरे, बचत गटांच्या अध्यक्षा सुनीताताई कांबळे, मायाताई गायकवाड, सुभाष कदम, विशाल शिंदे, किसनजी रोकडे, उमेश मोरे, बौद्धाचार्य पी. के़ पवार, गंगाराम गायकवाड, शेखर शिंदे, संतोष कांबळे, पंकज हरगुडे, कुमार नवरे, महादेव गंगावणे, विजय कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते़ सूत्रसंचालन धम्मप्रबोधन सुधाकरजी अभंग यांनी केले़

Web Title: Ambedkar's mindset at Siddhevwana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.