आंबेडकरांचा संघर्ष सर्व बहुजन समाजासाठी : काळे
By admin | Published: April 16, 2015 11:05 PM2015-04-16T23:05:43+5:302015-04-16T23:05:43+5:30
देशात १ रुपयाचे योग्य मूल्य ठरविण्याचे सामर्थ्य केवळ डॉ. आंबेडकरांमध्ये होते. डॉ. आंबेडकरांनी बहुजन समाजासाठी आयुष्यभर संघर्ष केला.
नारायणगाव : देशात १ रुपयाचे योग्य मूल्य ठरविण्याचे सामर्थ्य केवळ डॉ. आंबेडकरांमध्ये होते. डॉ. आंबेडकरांनी बहुजन समाजासाठी आयुष्यभर संघर्ष केला. काही लोकांनी बाबासाहेबांना दलितांचे कैवारी म्हणून त्यांचे विशाल कार्य मर्यादित करण्याचा प्रयत्न केला. सर्व महापुरुषांनी आयुष्यभर जातीयता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आपण जातीयता वाढवत चाललो आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाजप्रबोधनकार प्रा. कुमार काळे यांनी केले.
जुन्नर तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने वसंत व्हिला येथे सर्व महापुरुष व समाजसुधारकांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या वेळी ‘महापुरुषांच्या जीवनसंघर्षातून आपण कोणती प्रेरणा घ्यावी..?’ या विषयावर व्याख्यान देताना प्रा. काळे बोलत होते. तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी आमदार शरद सोनवणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून दीपक खैरे, अनिल मेहेर, आशा बुचके, बबनराव काळे, राज पाटे, रमेश हांडे, संभाजी साळवे, पोपट राक्षे, आशिष माळवदकर, योगेश पाटे, संतोष वाजगे, अतुल कांकरिया, आरिफ आतार, डी. के. भुजबळ, पंडित मेमाणे, पद्मभूषण गायकवाड, कवाळे उपस्थित होते.
महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. आतिश उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिशरण, पंचशील व सामुदायिक बुद्धवंदना घेतली. संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन शिल्पा कदम यांनी केले. दिनेश वाव्हळ यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र रणदिवे यांनी प्रास्ताविक केले. विलास कडलाक यांनी सूत्रसंचालन केले. सचिन लोखंडे यांनी आभार मानले. शेखर डबडे, पंकज खरात, पराग सोनवणे, नितीन पंडित, अनिल अभंग, प्रा. सुधीर रोकडे, डॉ. प्रदीप जोशी, दिनकर जाधव, संजय जंजाळ यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
बेल्हा : आणे येथील ग्रामपंचायतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सरपंच श्वेतांबरी आहेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संगीता थोरात यांच्या हस्ते झाले. या वेळी किशोर आहेर, जावेद आतार, बाळासाहेब थोरात,अलीम जमादार, दिनकर शिंदे उपस्थित होते.
वाल्हे : येथील परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त वाल्हे गावांतर्गत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
येथील सिद्धार्थनगरमध्ये तरुण मंडळाच्या वतीने आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाल्हेच्या सरपंच गोळे, ग्रामपंचायत सदस्या वंदना गायकवाड, माजी सरपंच दत्तात्रय पवार, पिंगोरीच्या सरपंच पल्लवी भोसले, महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष सूर्यकांत भुजबळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, संतोष भुजबळ, दीपक कुमठेकर, नीलेश भोसले, विलास कुंभार, किरण गदादे, एम. आर. भोसले, दादा राऊत, प्रीतम भोसले उपस्थित होते. सायंकाळी आकर्षक ट्रॅक्टरमधून आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. सचिन भोसले, अनिल भोसले व अतुल गायकवाड यांनी धम्मवंदना दिली. दीपक कुमठेकर यांनी प्रास्ताविक केले. अमोल गायकवाड यांनी सूत्रसंचालन, तर देवीदास भोसले यांनी आभार मानले.