आंबेगाव खरेदी संघाला सात लाखांचा निव्वळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:10 AM2021-03-23T04:10:39+5:302021-03-23T04:10:39+5:30
आंबेगाव तालुका सह.खरेदी-विक्री संघ लि. मंचरची ६२ वी वार्षिक सभा ऑनलाईन झाली. कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील ...
आंबेगाव तालुका सह.खरेदी-विक्री संघ लि. मंचरची ६२ वी वार्षिक सभा ऑनलाईन झाली. कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाने संस्थेचे संचालक मंडळ काम करत आहे. संस्थेचा उद्देश नफा मिळवणे हा नसून तालुक्यातील शेतकरी बांधवांना योग्य व वाजवी दरात रासायनिक खत पुरवठा करणे असल्याचे वाघ यांनी सांगितले. कोरोना सारख्या महामारीच्या काळात संघाच्या सर्व सेवकांनी प्रामाणिकपणे काम करून संस्थेचा नफा वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असे यावेळी संघाचे अध्यक्ष भगवानराव वाघ यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष रामनाथ बांगर,संचालक नाथा घेवडे पाटील,संजय गोरे,मारुती डोके, संतोष बारवे,मनोजकुमार रोडे, सुभाष गेंगजे,वैभव काळे,प्रविण खालकर,संचालिका प्रतिभा कराळे,चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.
संघाचे प्रभारी व्यवस्थापक गणेश हुले यांनी अहवाल वाचन केले व सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. बाळासाहेब बाणखेले, भरत चिखले, अशोक आदक पाटील, भरत फल्ले यांनी चर्चेत भाग घेतला. सूत्रसंचालन अनिल वाळूंज यांनी केले. उपस्थितांचे स्वागत रमेश खिलारी यांनी केले. तर आभार मधुकर बोऱ्हाडे यांनी मानले.
२२ मंचर