आंबेगाव तालुक्यातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:09 AM2021-04-10T04:09:38+5:302021-04-10T04:09:38+5:30
तळेघर तालुक्याच्या पश्चिम भागातील केंद्रबिंदूचे ठिकाण समजले जाते. या भागातील चाळीस गावांतील लोक विविध कामानिमित्त या ठिकाणी येत असतात. ...
तळेघर तालुक्याच्या पश्चिम भागातील केंद्रबिंदूचे ठिकाण समजले जाते. या भागातील चाळीस गावांतील लोक विविध कामानिमित्त या ठिकाणी येत असतात. परंतु दोन दिवसांपासुन गावामध्ये ते वीस व जवळच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून लागल्यामुळे या भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये तळेघर, तिरपाड, पांचाळे बु., कुशिरे, असाणे, डोणी, पाटण, निगडाळे, फलोदे, जांभोरी, बोरघर, राजपुर, गाडेवाडी आदी गावे व वाड्यावस्त्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये तळेघर गावामध्ये कोरोनाबाधित रूग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी तळेघर गाव व आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला आहे.
या दरम्यान पंचायत समिती सभापती संजय गवारी माजी सभापती सलिमभाई तांबोळी व घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे पोलीस हवालदार दीपक काशिद, शरद कुलवडे यांनी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना भेटी देऊन कोरोना नियमांबाबत सूचना केल्या लॉकडाऊन पाळण्यासाठी पुन्हा आवाहन केले. दुसरीकडे लसीकरणासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांनी बाहेर यावे व स्वत:हून लस घ्यावी, असे आवाहन केले.
--
तालुक्याच्या पश्चिम भागातील बांधवांनी भीती न बाळगता मोठ्या प्रमाणात लसीकरण करुन घ्यावे. वाड्यावस्त्यावरील कोणीही लसीकरणापासून वंचित राहू नये. प्रशासनाला सहकार्य करून तत्काळ लस घ्यावी.
-जालिंदर पठारे
गटविकास अधिकारी
————————————————————
तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये लग्न, दशक्रिया विधी यांमध्ये अटी शर्तींची परवानगी असताना काही ठिकाणी लोक गर्दी करत होते. त्यामुळे नाईलाजाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागला. यापुढेही ही कारवाई सुरु राहणार आहे.
-
प्रदीप पवार
सहायक पोलीस निरीक्षक घोडेगाव
__________________________________
फोटो ०९ तळेघर निर्मनुष्य रस्ते
फोटो ओळी : तळेघरमधील कडकडीत लॉकडाऊनमुळे निर्मनुष्य झालेला रस्ता.