रोज ५० रुग्णांना घेऊन रुग्णवाहिकेची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:10 AM2021-04-28T04:10:56+5:302021-04-28T04:10:56+5:30

ऑक्सिजनची सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेला सध्या मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा इतर ...

Ambulance roaming with 50 patients daily | रोज ५० रुग्णांना घेऊन रुग्णवाहिकेची भटकंती

रोज ५० रुग्णांना घेऊन रुग्णवाहिकेची भटकंती

Next

ऑक्सिजनची सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेला सध्या मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा इतर त्रासामुळे डॉक्टर तत्काळ रुग्णालयात दाखल होण्यास सांगतात. तिथून पुढे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरु होते. रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास बराच वेळ लागतो. त्यानंतर जिथे बेड मिळेल तेथे रुग्णाला दाखल करू, या विचाराने बेड मिळविण्यासाठी प्रवास सुरु होतो. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने थेट रुग्णालयात सहजासहजी ऑक्सिजन बेडच उपलब्ध होत नाही. त्यामुळे एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात चकरा माराव्या लागतात. एवढे फिरून बेड मिळेल याची शाश्वती नसते.

रुग्णवाहिकेत ऑक्सिजन पुरेसा असेल तर बेड मिळण्यास उशीर लागला तरी काही वेळेला काळजी नसते. मात्र ऑक्सिजनची कमतरता भासू लागली की, ताण वाढतो. अशा वेळी ऑक्सिजन बेड मिळणे खूप गरजेचे असते. गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना घडत आहेत. काहींना बेड मिळतो तर काहींना तसेच पुन्हा घरी सोडावे लागते. असे रुग्णवाहिका चालकांनी सांगितले.

शहरात असलेल्या कोविड रुग्णालयांची संख्या १२६

1) शहरातील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी असेलेले बेड

एकूण बेड्स -१००४३ भरलेले - ९५६९ रिक्त ४७४

विनाऑक्सिजन -२१९६ भरलेले - १८७५ रिक्त ३२१

ऑक्सिजन बेड ६५२१ , भरलेले - ६३६३ रिक्त १४९

आयसीयू - ६०३, भरलेले - ६०१ , रिक्त -०२

व्हेंटिलेटर- ७३२ , भरलेले - ७३० , रिक्त -०२

कोविड केअर सेंटर एकूण बेड १२०० , भरलेले ७६५, रिक्त ४३५

................

कोट

सध्य परिस्थितीमध्ये बेड मिळणे कठीण होऊन बसले आहे. दिवसभर फिरूनसुद्धा बेड न मिळाल्याने तसेच पुन्हा रुग्णाला घरी सोडण्याची वेळ येते. विनाऑक्सिजनचे बेड उपलब्ध होतात. मात्र ऑक्सिजन आणि व्हेन्टिलेटरचे बेड मिळत नसल्याची बिकट अवस्था आहे.

- भगवान राठोड, रुग्णवाहिका चालक.

खूप चौकशा आणि कष्टाने ऑक्सिजन किंवा व्हेन्टिलेटरचा बेड मिळतो. एका माहितीशिवाय एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरले तर त्रास सहन करावा लागतो. सिटी स्कॅनचा स्कोअर ९ किंवा १० च्या आतच असेलच तर काही रुग्णालयात बेड असेल तर दाखल करून घेतात. नवीन रुग्णालयाने सुरू होत असल्याने बेड मिळण्याची शाश्वती वाटते.

- नामदेव कांबळे, रुग्णवाहिकाचालक.

कधी कोरोनाबाधित रुग्ण तर इतर आजाराच्या रुग्णाला घेऊन जावे लागते. कोरोनाबाधित नसलेला रुग्ण देखील गंभीर असतो. मात्र त्याची कोरोनाची टेस्ट केली असेल तरच दाखल करून घेतले जाते. अन्यथा त्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन फिरावे लागते.

- गोकुळ साठे, रुग्णवाहिका चालक.

Web Title: Ambulance roaming with 50 patients daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.