रुग्णवाहिकेची वाट बिकट, पुणे, उद्योगनगरीतही वाहनचालकांची असंवेदनशीलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:07 AM2018-02-23T01:07:59+5:302018-02-23T01:08:04+5:30
रुग्णवाहिकेला आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी सायरन आणि हॉर्नचा एकत्रित आवाज देखील कमी पडू लागला आहे. अत्यावश्यक सेवा असतानाही बहुतांश नागरिक रुग्णवाहिकेला वाट मोकळी करुन
पुणे : रुग्णवाहिकेला आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी सायरन आणि हॉर्नचा एकत्रित आवाज देखील कमी पडू लागला आहे. अत्यावश्यक सेवा असतानाही बहुतांश नागरिक रुग्णवाहिकेला वाट मोकळी करुन देत नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले आहे. असंवेदनशील वाहनचालकांकडून सामाजिक जबाबदारीचे किमान भानदेखील ठेवले जात नसल्याचे अधोरेखित झाले आहे. उद्योगनगरीतही वारंवार अशा घटनांना रुग्णवाहिकांना सामोरे जावे लागत आहे.
प्रत्येकाने कधी ना कधी रुग्णवाहिका गर्दीत अडकल्याचे पाहिले असेल. काहींनी जागा करुन दिली असेल, तर काहींनी दुर्लक्ष केला असेल. खरेतर, शहरातील वाहनांची गर्दी, रस्त्यांची लांबी-रुंदी, विचित्रपद्धतीने पार्किंग केलेली वाहने आणि प्रत्येक रस्ता पाच वर्षांतून एकदा-दोनदा विकसित (?) करायचाच असा चंग लोकप्रतिनिधींनी बांधलेला असल्याने कायमच रस्त्यांचा आकार विविध ठिकाणी दुरुस्तीसाठी आक्रसला जातो. अशा वातावरणात त्रासलेले वाहनचालक किमान सामाजिक जबाबदारी देखील हरवून बसले की काय? अशी स्थिती पाहायला मिळत आहे.
लोकमत प्रतिनिधीने अॅम्ब्युलन्सला वाहनचालक कसा प्रतिसाद देतात याची पाहणी करण्यासाठी निमगर्दीची दुपारी चार ते सव्वापाच अशी वेळ निवडली. त्यालाही नागरिकांनी समाधानकारक प्रतिसाद दिला नाही. ऐन गर्दीच्या वेळी म्हणजे सायंकाळी ५ ते रात्री ७ या वेळेतील अॅम्बुलन्सचे हाल कल्पनातीतच असतील.
लॉ कॉलेज रस्त्यापासून पाहणीस सुरुवात केली. त्यानंतर सायरन सुरु असलेल्या रुग्णवाहिकेचा प्रवास ससून रुग्णालयाच्या दिशेने सुरु झाला. सायरन असूनही चालकांना सातत्याने हॉर्न वाजवून अॅम्बुलन्सच्या अस्तित्वाची सातत्याने जाणीव करुन द्यावी लागत होती. प्रभात रस्त्यावरुन फग्युर्सन महाविद्यालय रस्त्याकडे रुग्णवाहिका नेली. याठिकाणी रुग्णवाहिका येत असल्याचे दिसत असतानाही अनेक पादचारी तसेच रस्ता ओलांडत होते. येथे दुतर्फा वाहने लावण्यात येत असल्याने रस्ता वाहनांसाठी कमी पडत आहे. त्यातच रस्त्यावर चारचाकी वाहनांची संख्या अधिक असल्याने रुग्णवाहिकेला वाट काढणे मुश्किल जात होते. अनेक वाहन चालक वाट देण्या ऐवजी वाहन वेगाने दामटताना दिसत होते.
1रुग्णवाहिकेला वाट न करुन देणाºयांची संख्या अधिक असली तरी पाहणी दरम्यान चार सन्माननीय अपवाद आढळून आले. ससून रुग्णालया जवळ संरक्षण विभागाची जीप जात होती. त्यावेळी चालकाने गाडी बाजुला घेत, हाताने पुढे जायचा इशारा दिला.
2कॅम्पात एका टेम्पो चालकाने, हडपसर येथे एका चारचाकी चालक आणि सदाशिव पेठेतील ना. सी. फडके चौकात देखील चार चाकी चालकाने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अॅम्बुलन्सला पुढे जाण्याचा इशारा दिला.
कॉंग्रेसभवन रस्ता, महानगरपालिकामार्गे मंगळवार पेठेतील जुना बाजाराकडे जाताना रुग्णवाहिका सिग्नलला काही काळ अडकून पडली. पुणे स्टेशनकडे जाताना मालधक्का चौकाच्या अलिकडे भलीमोठी वाहनांची रांग लागलेली होती. त्यानू मार्गक्रमण करताना चांगलीच दमछाक करावी लागली. लोकमत कार्यालयापासून ससून रुग्णालयापर्यंतच्या साडेसहा किलोमीटरचे अंतर पार करण्यास १८ मिनिटांचा कालावधी लागला.
1ससून रुग्णालयापासून हडपसर येथील नोबेल रुग्णालयापर्यंत पुढे प्रवास करण्यात आला. या मार्गात कॅम्पमधील रुग्णवाहिकेचा प्रवास व्यवस्थित झाला पुढे हडपसरकडे जात असताना एकीकडे बीआरटी मार्ग असल्याने दोनच लेन वाहनांसाठी उपलब्ध आहेत. हडपसर व मगरपट्टा या
ठिकाणी अनेक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या असल्याने त्यांना ने-आण करणाºया वाहनांची संख्या अधिक आहे. तसेच शहरातून सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक अधिक असल्याने वाहतूकीचा वेग मंदावत आहे. ससून रुग्णालयापासून नोबेल रुग्णालयापर्यंत जाण्यास १४
मिनिटांचा कालावधी लागला. 2पुढे स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे रुग्णवाहिका नेण्यात आली. राजाराम पुलावरुन डीपी
रस्त्याने नळस्टॉपमार्गे लोकमत कार्यालयाकडे प्रवास करण्यात आला. नळस्टॉप येथील सिग्नलला रुग्णवाहिकेला २ मिनिटाहून अधिक काळ थांबावे लागले. विशेष म्हणजे या ठिकाणी आणखी एक रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकलेली असताना वाहनचालकांनी वाट करुन दिली नाही.