Pune: मित्राच्या मोटारसायकलने केला घात; संशयावरुन कोयत्याने वार, युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

By विवेक भुसे | Published: November 22, 2023 03:25 PM2023-11-22T15:25:46+5:302023-11-22T15:26:18+5:30

पोलिसांनी योगेश डिरे आणि रज्जत चौधरी (दोघे रा. केशवनगर, मुंढवा) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे....

Ambush by a friend's motorcycle; Suspicion stabs, attempts to kill young man | Pune: मित्राच्या मोटारसायकलने केला घात; संशयावरुन कोयत्याने वार, युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune: मित्राच्या मोटारसायकलने केला घात; संशयावरुन कोयत्याने वार, युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : मामाच्या घरी जेवणाचा डब्बा आणण्यासाठी तो मित्राची मोटारसायकल घेऊन गेला. या मोटारसायकलमुळे दुपारच्या भांडणात तो असावा, या संशयावरुन दोघा गुंडांनी कोयत्याने वार करुन एका १७ वर्षाच्या युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याबाबत ओंकार विजय गायकवाड (वय १७, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) हा गंभीर जखमी झाला असून त्याने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी योगेश डिरे आणि रज्जत चौधरी (दोघे रा. केशवनगर, मुंढवा) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. योगेश डिरे हा रेकॉर्डवरील गुंड आहे. हा प्रकार केशवनगरमधील रेणुकामाता मंदिरासमोर सोमवारी रात्री दहा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार गायकवाड व त्याचा मित्र निलेश असे फिर्यादीच्या मामाच्या घरी जेवणाचा डब्बा आणण्यासाठी जात होते. त्यांनी इमाम शेख या मित्राकडे त्याची दुचाकी मागितली. तेव्हा इमाम शेख याने माझी केशवनगर येथील योगेश डिरे याच्यासोबत दुपारी भांडणे झाली आहेत. तू गाडी घेऊन गेला तर तो माझी गाडी ओळखून तुझ्याशी भांडणे करेल, असे सांगितले. त्याकडे दुर्लक्ष करुन ओंकार हा त्याची दुचाकी घेऊन केशवनगरला गेला. तेव्हा योगेश डिरे व रज्जत चौधरी यांनी त्यांना अडविले. दुपारच्या भांडणात तू होता ना तुला लय मस्ती आली होती ना तुझी विकेटच टाकतो, असे म्हणून कमरेचा कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. कोयत्याने व दगडाने मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक करपे तपास करीत आहेत.

Web Title: Ambush by a friend's motorcycle; Suspicion stabs, attempts to kill young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.