व्हॉट्सअॅप पोस्टवरुन खोपोलीत वातावरण तंग
By admin | Published: March 17, 2017 07:16 PM2017-03-17T19:16:43+5:302017-03-17T19:18:49+5:30
वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्ट खोपोलीमधील केएमसी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे प्राध्यापक सुनिल वाघमारे यांची असल्याचे स्पष्ट झाले.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
खोपोली, दि. 17 - छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्ट खोपोली शहरात फिरु लागली आणि शिवप्रेमींचा संताप अनावर झाल्याने खोपोली शहरातील वातावरण तंग झाले होते. ही वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्ट खोपोलीमधील केएमसी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे प्राध्यापक सुनिल वाघमारे यांची असल्याचे स्पष्ट झाल्याने, मोठ्या संख्येने शिवप्रेमीनी महाविद्यालयावर चाल करून संताप व्यक्त केला.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच महाविद्यालयात पोलिसांनी धाव घेत वादग्रस्त पोस्ट टाकल्या प्रकरणी प्राध्यापक सुनिल वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच वेळी संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी सुनिल वाघमारे याला तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
या बाबत मिळत असलेल्या माहितीनुसार , शुक्रवारी सकाळ पासून , शिवाजी महाराजांच्या दोन जयंती बाबत एक वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्ट फिरत होती.अधिक तपासानंतर सदर पोस्ट अत्यंत संताप निर्माण करणारी असून ती पोस्ट येथील केएमसी महाविद्यालयातील प्राध्यापक सुनिल वाघमारे यांनी ती पोस्ट जाणीवपूर्वक टाकली असल्याचे स्पष्ट झाले.