अमेरिकन तरूणीला केले  ‘बॉलिवूड’ ने घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 07:00 AM2019-08-10T07:00:00+5:302019-08-10T07:00:02+5:30

भारतीय हिंदी चित्रपटांचा संशोधनपूर्ण अभ्यास करण्यासाठी ‘बेकर नॉर्ड फंडिंग हयूमँनिटीज’ची फेलोशीप मिळाल्याने ती इंटर्नशीपसाठी पुण्यात आली आहे.

American girl in love of '' Bollywood '' | अमेरिकन तरूणीला केले  ‘बॉलिवूड’ ने घायाळ

अमेरिकन तरूणीला केले  ‘बॉलिवूड’ ने घायाळ

Next

- नम्रता फडणीस- 

पुणे : एका परदेशी तरूणीनं वयाच्या पाचव्या वर्षी काजोल आणि शाहरूख खानचा  ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट काय पाहिला आणि ‘ती’चक्क हिंदी चित्रपटांच्या प्रेमातच पडली...तिचं हे प्रेम एवढ्यापुरतचं मर्यादित राहिलं नाही तर शालेय जीवनात तिनं दुसरी भाषा म्हणून हिंदी भाषेची निवड केली आणि हिंदीचे चार ते पाच वर्ष शिकवणी लावून धडे गिरवले....आता हिंदी चित्रपटांचा अभ्यास करण्यासाठी ‘ती’ प्रथमच भारतात आली असून, पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये ‘ती’ इंटर्न म्हणून काम करीत आहे. ‘बॉलिवूड’च्या चित्रपटांनी तिला वेड लावले असून, ती या चित्रपटांनी अक्षरश: भारावून गेली आहे. 
   तिचं नाव आहे, ‘ऐना कुक’. ही एकवीस वर्षीय युवती अमेरिकेतील असून, क्लिवलँड ओहायो मधील केस वेस्टर्न रिझवर््ह युनिव्हर्सिटीमध्ये कला शाखेचे शिक्षण घेत आहे. भारतीय हिंदी चित्रपटांचा संशोधनपूर्ण अभ्यास करण्यासाठी ‘बेकर नॉर्ड फंडिंग हयूमँनिटीज’ची फेलोशीप मिळाल्याने ती इंटर्नशीपसाठी पुण्यात आली आहे. सध्या ती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील हिंदी चित्रपटांच्या  खजिन्यात पूर्णत: हरवून गेली आहे. हिंदी भाषेवर उत्तम प्रभुत्व असलेल्या या अमेरिकी तरूणीशी ‘लोकमत’ने संवाद साधला. 
ऐना म्हणाली, दीदी दक्षिण आफ्रिकेला गेली होती. तिथून तिनं  ‘कुछ कुछ होता है’आणि  ‘दिल तो पागल’ च्या डीव्हीडी आणल्या होत्या. पाच वर्षांची असताना  ‘कुछ कुछ होता है’चित्रपट पाहिला. त्यातली ’अंजली’ खूपच आवडली. काजोलच्या तर प्रेमातच पडले. चित्रपटाची कहाणी, गाणी सगळचं आवडलं. त्यानंतर काजोलचे सगळे चित्रपट पाहिले. त्यातून हिंदी चित्रपटांविषयीचे आकर्षण अधिकच वाढले. शाळेत असताना हिंदी भाषा शिकले. दरम्यान, एक कं ट्री रिपोर्ट केला होता.  मला चित्रपटांविषयी संशोधन करण्यासाठी फेलोशीप मिळाली.  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आल्यानंतर जुनी पोस्टर्स, फोटो, चित्रपट असा खजिना खुला झाल्याने मी अक्षरश: भारावून गेले आहे .हिंदी चित्रपटातील जुन्या अभिनेत्री, अभिनेत्यांविषयी जाणून घेण्यासाठी पुस्तकांचे वाचन करण्याबरोबरच चित्रपट पाहात  आहे. चित्रपटांचे जतन करणे ही आज काळाची गरज बनली आहे. दहा वर्षानंतर जेव्हा या गोष्टी जुन्या होतील तेव्हा मी त्याची साक्षीदार होते याचा आनंद वाटेल.
.........
भारतीय चित्रपट हे भावनिक असतात, जे कौटुंबिक आनंद देतात. त्यामुळे त्याच्याशी प्रत्येक जण नकळतपणे बांधले जातात. जे अधिक भावलं.  यातच भारतात चित्रपटांकडे पाहाण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे- ऐना कुक, अमेरिकन तरूणी
.................
ऐनाला हिंदी चित्रपटात अधिक रस आहे. ती खूप छान हिंदी देखील बोलते. तिच्याशी बोलल्यानंतर जाणवलं की भारतीय संस्कृती भावनेने जोडली गेलेली आहे, या एका गोष्टीनं तिला चित्रपटांकडे जास्त आकर्षित केलं आहे. जुन्या चित्रपटांची बुकलेटस पाहिल्यानंतर ती ग्रंथालयात जाऊन त्या चित्रपटांबददल जाणून घेते. सर्व संस्कृतीमधला कॉमन धागा ती शोधण्याचा प्रयत्न करते. हिंदी चित्रपटसृष्टीच्या शंभर वर्षांच्या इतिहासाचा ती अभ्यास करीत आहे. यावर ती प्रबंध लेखन करणार आहे- आरती कारखानीस, इनचार्ज रिसर्च अँंड डॉक्यूमेंटेशन सेक्शन, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय
.........
 

Web Title: American girl in love of '' Bollywood ''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.