'अमित शाह-देवेंद्र फडणवीस शरद पवारांना पटवतील अन् तेही एनडीएमध्ये येतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 02:18 PM2019-11-23T14:18:52+5:302019-11-23T14:32:23+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यात यापूर्वीही वाद झालेला आहे, परंतु एका खोलीत आल्यावर ते भांडणे मिटवतात.

Amit Shah-Devendra Fadnavis will convince Sharad Pawar and he too will come to NDA' | 'अमित शाह-देवेंद्र फडणवीस शरद पवारांना पटवतील अन् तेही एनडीएमध्ये येतील'

'अमित शाह-देवेंद्र फडणवीस शरद पवारांना पटवतील अन् तेही एनडीएमध्ये येतील'

Next

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यात यापूर्वीही वाद झालेला आहे, परंतु एका खोलीत आल्यावर ते भांडणे मिटवतात. मला खात्री आहे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे शरद पवार यांना पटवण्यात यशस्वी होतील आणि शरद पवारही एनडीएमध्ये सामील होतील असे वक्तव्य राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पुण्यात केले आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते. 

शनिवारी सकाळी भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावरून आता राष्ट्रवादीत फूट पडल्याचे दिसून येत आहे. याच मुद्द्यांवर काकडे यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की,  मी राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या अजित पवार यांचे आभार मानतो. त्यांनी भाजप आमदारांना राष्ट्रवादीच्या ५६ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले आणि आज सकाळी शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे हे सरकार मागील पाच वर्षात इतके व्यवस्थित चालेल की महाराष्ट्राचे मागील २० वर्षांपासून प्रलंबित असलेले सर्व प्रश्न मिटतील. शेतकऱ्यांचा आणि शहरी भागातला प्रश्न मिळेल.

यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना टोला लगावला, ते म्हणाले की, 'शिवसेनेचा पोपट त्यांच्या पोपटामुळेच झाला आहे. राऊत यांनी एक वाक्य वापरले होते की, शरद पवार आणि पवार कुटुंबियांना ओळखण्यासाठी १० जन्म घ्यावे लागतील. तो फॉरमॅट त्यांनाच स्वतःला लागू होईल त्यांनाच दहा जन्म पवार कुटुंबियांना ओळखता येणार नाही'

Web Title: Amit Shah-Devendra Fadnavis will convince Sharad Pawar and he too will come to NDA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.