अमित शहा घालणार साखर उद्योगांच्या प्रश्नांमध्ये लक्ष; सहकार परिषदेतील मागण्यांची घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 06:24 PM2022-11-30T18:24:53+5:302022-11-30T18:27:27+5:30
"साखर कारखान्यांच्या ‘इन्कम टॅक्स’चा प्रश्न सोडविण्याबाबत अमित शहा यांनीच पुढाकार घेतला..."
बारामती (पुणे) :बारामती येथे पार पडलेल्या सहकार परिषदेत मांडलेल्या साखर उद्योगांबाबतच्या समस्यांची खुद्द केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी दखल घेतली आहे. राज्याबरोबरच केंद्र सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी संवेदनशील असल्याचे बारामती लोकसभा प्रमुख अविनाश मोटे यांनी सांगितले.
बारामती येथे पत्रकारांशी बोलताना मोटे म्हणाले, अडचणींबाबत बारामतीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत सहकार परिषद पार पडली. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, पृथ्वीराज जाचक, सतीश काकडे यांनी सहकारी साखर उद्योगाबाबत विविध मागण्या, समस्या मांडल्या होत्या. त्यानंतर दुसरा दौऱ्यात केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्याबरोबर याच शेतकरी कृती समितीच्या नेत्यांनीदेखील साखर उद्योगातील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी पटेल यांच्यामार्फत सहकारमंत्री अमित शहा यांना निवेदन पत्र देण्यात आले. ते पत्र केंद्रीय मंत्री पटेल यांनी अमित शहा यांना दिले. शहा यांना ते पत्र मिळाले आहे. त्यांनी त्या पत्राची दखल घेतली आहे. त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शहा यांनी कृती समितीला दिले आहे. मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
केंद्रात सहकार मंत्रालय सुरू झाल्यावर साखर कारखान्यांच्या ‘इन्कम टॅक्स’चा प्रश्न सोडविण्याबाबत अमित शहा यांनीच पुढाकार घेतला. सहकार तज्ज्ञ म्हणविणाऱ्यांना या प्रश्नाचे त्यावेळी गांभीर्य समजले नाही. राज्यातीलच नव्हे तर देशातील साखर कारखान्यांचा प्रश्न त्यामुळे मार्गी लागला. सहकारी कारखानदारीला अनुकूल निर्णय घेतल्याने केंद्र सरकार ऊस उत्पादकांच्या पाठीशी असल्याचे सिध्द झाल्याचे मोटे यांनी सांगितले.