आर्थिक मंदीवरून देशाचे लक्ष वळविण्यासाठी अमित शाहांची सीएए खेळी यशस्वी - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 12:22 PM2019-12-21T12:22:42+5:302019-12-21T12:24:12+5:30

'आपल्या देशात135 कोटी लोक राहात आहेत'

Amit Shah's CAA drive to divert the country's attention from economic recession - Raj Thackeray | आर्थिक मंदीवरून देशाचे लक्ष वळविण्यासाठी अमित शाहांची सीएए खेळी यशस्वी - राज ठाकरे

आर्थिक मंदीवरून देशाचे लक्ष वळविण्यासाठी अमित शाहांची सीएए खेळी यशस्वी - राज ठाकरे

googlenewsNext

पुणे : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्धचे आंदोलन देशाच्या विविध भागांमध्ये पेटतच चालले आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. 

देशासमोर आर्थिक मंदीचे मोठे संकट उभे आहे. त्यामुळे केंद्र सरकार मतदारांच्या कोंडीत सापडले असते. म्हणून अमित शाहांनी अशी खेळी केली की  नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरित्व नोंदणी यांसारखे मुद्दे उपस्थित करून आर्थिक मंदीवरून देशाचे लक्ष वळवले. त्यात ते यशस्वी झाले. त्यासाठी त्यांचे अभिनंदन असे म्हणत राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली. 

आपल्या देशात135 कोटी लोक राहात आहेत. या लोकांचा भार सांभाळण्यात देश कमी पडतोय. अशा परिस्थितीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे बाहेरच्या लोकांना आपण भारतात घेत आहोत. त्यांची व्यवस्था कोण करणार? असा सवाल करत राज ठाकरे म्हणाले, "इथली व्यवस्था कोसळली आहे. जे इथले मुस्लिम नागरिक आहेत त्यांना असुरक्षित वाटण्याचे कारण नाही. मात्र बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळमधून किती मुस्लिम आले हे तपासून बघायला हवे. त्यांच्या सोयी लावण्यासाठी देश नाही. माणुसकीचा ठेका फक्त भारताने घेतलेला नाही. भारत धर्मशाळा नाही. बांगलादेशातील नागरिकांना हाकलून दिलेच पाहिजे."

आधार कार्डद्वारे लोक मतदान करतात, मग त्यावरुन नागरिकत्व का सिद्ध होऊ शकत नाही, आणि जर आधार कार्डाचा काहीही उपयोग नसेल तर त्यासाठी लोकांना रांगेत का उभे केले? हा सर्व खाटाटोप केला, तो कशासाठी होता? असा सवाल करत राज ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. याचबरोबर, बाहेरच्या देशातले लोक इथे आणण्याची गरज नाही. दरवेळी बॉम्बस्फोट झाल्यावर आपल्याला हे मुद्दे आठवतात. असे काही कडक पावले उचलावे लागतील अन्यथा हा हाताबाहेर गेलेला देश आहे. केंद्र सरकार, भाजपा आणि इतर पक्षांनी राजकारण करू नये, असे राज ठाकरेंनी ठणकावले आहे.
 

Web Title: Amit Shah's CAA drive to divert the country's attention from economic recession - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.