पुणे पोलिस आयुक्तपदी अमितेश कुमार, सहआयुक्तपदी प्रवीण पवार

By विवेक भुसे | Published: January 31, 2024 09:32 PM2024-01-31T21:32:28+5:302024-01-31T21:32:41+5:30

रितेशकुमार, डॉ. संजय शिंदे, रामनाथ पोकळे, रंजनकुमार शर्मा यांची बदली

Amitesh Kumar as Pune Police Commissioner | पुणे पोलिस आयुक्तपदी अमितेश कुमार, सहआयुक्तपदी प्रवीण पवार

पुणे पोलिस आयुक्तपदी अमितेश कुमार, सहआयुक्तपदी प्रवीण पवार

पुणे : राज्य सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून नागपूर शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पुणे पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. पुणे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांची राज्याच्या होमगार्डच्या महासमादेशकपदी नियुक्ती केली आहे.

कोकण परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची पुणे शहर पोलीस सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांचीही पुन्हा गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तसेच पिंपरी चिंचवडचे पोलिस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे यांची गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्यातील बदली झालेले व आलेले पोलिस अधिकारी : पोलिस आयुक्त रितेशकुमार ( महासमादेशक, होमगार्ड मुंबई), अमितेश कुमार (पोलिस आयुक्त नागपूर शहर ते पुणे शहर), प्रवीण पवार (विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र ते पोलिस सहआयुक्त, पुणे शहर), डॉ. संजय शिंदे (पोलिस सहआयुक्त, पिंपरी चिंचवड ते विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), रंजन कुमार शर्मा (अपर पोलिस आयुक्त, उत्तर विभाग, पुणे शहर ते विशेष पोलिस महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), नामदेव चव्हाण (पोलिस उपमहानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते विशेष पोलिस महानिरीक्षक, रा. रा. पोलिस दल, नागपूर),रामनाथ पोकळे (अपर पोलिस आयुक्त, गुन्हे पुणे शहर ते विशेष पोलिस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती), विनिता साहु (समादेशक, रा. रा. पोलिस दल, गट क्रं.५, दौंड ते अपर पोलिस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहनमुंबई), अंकित गोयल (पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते पोलिस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र), बसवराज तेली (पोलिस अधीक्षक सांगली ते पोलिस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), शैलेश बलकवडे (समादेशक, रा. रा. पोलिस दल, गट क्रं. १, पुणे ते अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर), एस जी दिवाण (समादेशक, रा. रा. पोलिस दल, गट क्रं. १६, कोल्हापूर ते पोलीस उपमहानिरीक्षक, पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान, पुणे), मनोज पाटील (पोलीस उपायुक्त, मुंबई ते अपर पोलिस आयुक्त, उत्तर विभाग, पुणे शहर), पंकज देशमुख (पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) , मितेश घट्टे (अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते पोलिस उपायुक्त, मुंबई), आनंद भोईटे (अपर पोलिस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण ते पोलीस उपायुक्त, मुंबई), संजय जाधव (अतिरिक्त नियंत्रक, नागरी संरक्षण व गृह रक्षक दल, मुंबई ते अपर पोलिस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण), रमेश चोपडे (अपर पोलिस अधीक्षक, चाळीसगाव, जि. जळगाव ते अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण), हिम्मत हिंदुराव जाधव (पोलिस उपायुक्त, मुंबई ते पोलिस उपायुक्त, पुणे शहर) विशाल गायकवाड (पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक ते पोलिस उपायुक्त, पिंपरी चिंचवड), काकासाहेब डोळे (पोलिस उपायुक्त, पिपंरी चिंचवड ते पोलिस अधीक्षक महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक).

Web Title: Amitesh Kumar as Pune Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.