Video: तुुम्ही आमच्या घरात घुसलात तर आम्ही कुठं-कुठं घुसू, रुपाली पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 06:17 PM2022-04-21T18:17:57+5:302022-04-21T18:19:09+5:30

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केले

Amol Mitkari: rupali patil thombre warn to brahman mahasangh on protest of amol mitkari states | Video: तुुम्ही आमच्या घरात घुसलात तर आम्ही कुठं-कुठं घुसू, रुपाली पाटलांचा इशारा

Video: तुुम्ही आमच्या घरात घुसलात तर आम्ही कुठं-कुठं घुसू, रुपाली पाटलांचा इशारा

Next

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादान विधीचा उल्लेख करत खिल्ली उडवल्याने आता राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मिटकरी यांनी केलेल्या विधानानंतर ब्राह्मण महासंघाने पुण्यात राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यावेळी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही समोर येत त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे याही हजर होत्या. त्यांनी आंदोलकांना थेट इशाराच दिला आहे.  

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केले. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे व त्यांचे सहकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. दोघांमध्ये झटापट झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही कार्यालयासमोर जमा झाले होते. याबाबत बोलताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी घडलेला प्रसंग सांगितला. तसेच, ब्राह्मण महासंघाला इशाराही दिला आहे. 

तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा असं आवाहन आंदोलनकर्त्यांना केलं होतं. मात्र, त्यांनी कार्यालयात घुसून मंत्र म्हणायला सुरुवात केली. तसेच, आमच्या नेत्यांबद्दल अपशब्दही बोलले. काही महिला पदाधिकाऱ्यांनी आमच्या पुरुष पदाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्या. त्यांचं आंदोलन झाल्यानंतर त्यांच्यासाठी आम्ही बुके 101 रुपये दक्षणा आणि केळीही आणली होती. परंतु, ते न घेता ते निघून गेले. आमच्याकडून किंवा अमोल मिटकरींकडून कोणत्याही भावना दुखावल्या गेल्या नाहीत. त्यांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन करावे. घुसण्याची भाषा करू नये, आमच्या घरात जर घुसलात तर, आम्ही कुठं-कुठं घुसू एवढं लक्षात ठेवावं त्यांनी, असा इशाराही रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे.  

ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा सवाल

अमोल मिटकरी हे मूर्ख असून ते ब्राह्मण समाजाविरोधात बोलले आहेत असे आम्ही म्हणतच नाही. पण त्यांनी हिंदु धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीने वापरला यावर आम्ही आक्षेप घेतला आहे. मी माझी बायको पुरोहिताला देत आहे असं त्यांनी म्हटलं होत. हे चुकीचं आहे. नमाजविरोधात मिटकरी असं बोलतील का? असा सवाल ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी हिंदु धर्माचं त्यांनी विडंबन केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध आंदोलन केले आहे. असा कुठलाही मंत्र लग्नांमध्ये बोललाच जात नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

मिटकरींना माफी तर मागावीच लागेल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानेच फेसबुकवर जाहीर पोस्ट करत अमोल मिटकरीला माफी तर मागावीच लागेल असं विधान केले आहे. त्यामुळे मिटकरींच्या विधानामुळे राष्ट्रवादीतही नाराजी असल्याचं समोर आले आहे. राष्ट्रवादीचे बीडमधील नेते, परळीतील माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, हिंदु धर्मात कधीच मम् भार्या समर्पयामी असा मंत्र नसतो. कदाचित मिटकरीला आमदारकीसाठी सापडलेले हे तंत्र असू शकते. ही जाहीर खिल्ली आहे असं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Amol Mitkari: rupali patil thombre warn to brahman mahasangh on protest of amol mitkari states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.