मालकाने लाटली भविष्यनिर्वाह निधीची रक्कम
By admin | Published: December 23, 2016 12:56 AM2016-12-23T00:56:50+5:302016-12-23T00:56:50+5:30
कामगारांची तब्बल ५८ लाख ९२ हजार रुपयांची भविष्यनिर्वाह निधीची रक्कम लाटल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकाविरुद्ध स्वारगेट
पुणे : कामगारांची तब्बल ५८ लाख ९२ हजार रुपयांची भविष्यनिर्वाह निधीची रक्कम लाटल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकाविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०१६ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीमध्ये घडला.
ओमप्रकाश मोतीलाल साबू (रा. वरळी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रुबी घोष (वय ४२, रा. विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
घोष या भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात प्रवर्तन अधिकारी आहेत. साबू याचे गुलटेकडी येथील स्मॉल स्केल इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये फर्स्ट फ्लाइट कुरिअर्स लिमिटेड नावाचे कार्यालय आहे. निधीची रक्कम कपात करूनही भविष्यनिर्वाह विभागात जमा न करता फसवणूक केली. (प्रतिनिधी)