पकडलेल्या १ कोटीच्या नोटा बेनामी घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 05:35 AM2017-11-07T05:35:12+5:302017-11-07T05:35:15+5:30

पालघर येथे मोटारीत सापडलेल्या १ कोटी ११ लाख १५,५०० रुपयांच्या रकमेची मालकी स्वीकारण्यास वसई विरार महापालिकेचे नगरसेवक धनंजय गावडे यांच्यासह तिघांनी नकार दिल्याने आयकर विभागाने ही रक्कम बेनामी घोषित केली.

An amount of rupees one crore notes declared | पकडलेल्या १ कोटीच्या नोटा बेनामी घोषित

पकडलेल्या १ कोटीच्या नोटा बेनामी घोषित

Next

पुणे : पालघर येथे मोटारीत सापडलेल्या १ कोटी ११ लाख १५,५०० रुपयांच्या रकमेची मालकी स्वीकारण्यास वसई विरार महापालिकेचे नगरसेवक धनंजय गावडे यांच्यासह तिघांनी नकार दिल्याने आयकर विभागाने ही रक्कम बेनामी घोषित केली. आयकर विभागाच्या बेनामी प्रोहिबिशन पुणे युनिटचे अध्यक्ष मुकेशकुमार व सदस्य तुषार शहा यांनी हा निर्णय दिला आहे़
पालघर पोलीस आणि आयकर विभागाने संयुक्तपणे नालासोपारा येथील प्रगती नगरनाका येथे १५ डिसेंबर २०१६ रोजी केलेल्या कारवाईत एका मोटारीत १ कोटी १५ लाख १५ हजार ५०० रुपयांची रक्कम आढळली़ त्यातील ४७ लाख रुपयांच्या २ हजार रुपयांच्या नवीन नोटा होत्या़ या मोटारीत सुदर्शन आनंद शेरेगर आणि नगरसेवक धनंजय गावडे हे दोघे होते़ त्यांना या पैशांचा नेमका स्त्रोत सांगता आला नाही़ त्यामुळे आयकर विभागाने ते जप्त केले होते़ पोलिसांनी केलेला पंचनामा व तपास अधिकाºयांनी केलेल्या तपासात हे पैसे आमचे नसून ते आम्हाला प्रमोद दळवी यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले़ आयकर विभागाने दळवी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हे पैसे आपल्याला आदल्या दिवशी गावडे यांच्यावतीने एका अनोळखी व्यक्तीने दिल्याचे सांगितले़ गावडे यांनी या गोष्टीचा इन्कार करुन हे पैसे आपले नसल्याचे सांगितले़ त्यानंतर आयकर विभागाने या तिघांनाही ही रक्कम बेनामी का जाहीर करू नये, अशी नोटीस बजावली़ त्यावर त्यांनी या रकमेची मालकी नाकारली़

Web Title: An amount of rupees one crore notes declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.